जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

चंद्रकांत कोद्रे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर (वार्ताहर)

संवत्सर (रामवाडी) येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत परसराम कोद्रे यांचे मंगळवार दि.१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.२५ वाजता दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते ७२ वर्षाचे होते.संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

कै.चंद्रकांत कोद्रे यांचा शेती व्यवसायाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक कार्यात मोठा सहभाग होता. रामवाडी भागातील मुलांची शिक्षणाची सुविधा व्हावी म्हणून त्यांनी शाळेसाठी स्वतःची जागा दिली.आज त्या जागेवर शाळेची इमारत झालेली असून अनेक मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत

    कै.चंद्रकांत कोद्रे यांचा शेती व्यवसायाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक कार्यात मोठा सहभाग होता. रामवाडी भागातील मुलांची शिक्षणाची सुविधा व्हावी म्हणून त्यांनी शाळेसाठी स्वतःची जागा दिली.आज त्या जागेवर शाळेची इमारत झालेली असून अनेक मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. दूध उत्पादकांचे नेते स्व. नामदेवराव परजणे यांच्या सामाजिक कार्यात त्यांचा अग्रणी सहभाग असायचा. धार्मिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. स्व.परजणे  यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी कार्य केले. स्व. अरविंदराव ससाणे यांचे ते निकटचे नातेवाईक होते. शेतीमध्येही वेगवेगळे आधुनिक प्रयोग करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकीक प्राप्त केला. तात्याबाबा म्हणून ते संवत्सर परिसरात सर्वांचेच परिचयाचे होते. संदीप व परिमल कोद्रे यांचे ते वडील तर संजय व सिध्दार्थ कोद्रे यांचे ते चुलते होते.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्संस्कार करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील, उपसरपंच विवेक परजणे यांच्यासह ग्रामस्थ,नातेवाईक व मोठा जनसमुदाय उपस्थित होता. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी कोद्रे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close