जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रावसाहेब मासाळ यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   जवळके धोंडेवाडी येथील रहिवासी व निळवंडे कालवा कृती समितीचे सक्रिय कार्यकर्ते रावसाहेब मासाळ यांच्या मातोश्री साखरबाई कचरू मासाळ (वय -७५) यांचे आज सायंकाळी ७.१६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.

   स्व.साखरबाई मासाळ या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या म्हणून जवळकें-धोंडेवाडी परिसरात परिचित होत्या.त्यांचे मुळगाव जामखेड होते.त्यांचे सुपुत्र रावसाहेब मासाळ हे व्यवसायामुळे धोंडेवाडी येथे सत्तावीस वर्षापूर्वी स्थायीक झाले होते.त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी सर्व जबाबदारी सांभाळली होती.त्यांच्यावर धोंडेवाडी येथील स्मशान भूमीत उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

   त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,उपाध्यक्ष संजय गुंजाळ,नानासाहेब गाढवे,सचिव कैलास गव्हाणे,माजी उपाध्यक्ष जवळके येथील सरपंच सारिका विजय थोरात,रमेश दिघे,गंगाधर रहाणे,सोन्याबापू उर्हे सर,बाबासाहेब गव्हाणे,कौसर सय्यद,अप्पासाहेब कोल्हे,तानाजी शिंदे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाबद्दल नगर,जामखेड,कोपरगाव,राहता तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close