नगर जिल्हा
पुणतांबा फाटा-झगडे फाटा रस्त्याचे काम लवकरच-आ.काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पश्विम भागातील तळेगाव मळे, दहेगाव, लौकी, घोयेगाव, संवत्सर, कोकमठाण, गोधेगाव आदी गावातील नागरिकांसाठी अहंम भूमिका निभावणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गाला पडलेल्या खड्ड्यांचे ग्रहण सुटले असून असल्याचे आ. आशुतोष यांनी म्हटले असून लवकरच पुणतांबा फाटा-झगडे फाटा रस्त्याचे कामदेखील सुरु होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे जिल्हा हद्द पर्यंतच्या १८ किलोमीटर कामाच्या शुभारंभ प्रसंगी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नव्याने घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक नियोजन आराखड्या अंतर्गत पुणतांबा फाटा ते तळेगाव मळे या १८ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी १७ कोटी ९३ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभ नूकताच मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
या प्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, जी.प. सदस्या सोनाली साबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, सुधाकर रोहोम, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, सदस्य मधुकर टेके, कारभारी आगवन, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादा टुपके, ज्ञानदेव जामदार, आण्णासाहेब जामदार, दिलीपराव बोरणारे, बाळासाहेब जगताप, गोपाळराव भवर, राहुल जगधने, प्रसाद साबळे, सरपंच सचिन क्षीरसागर, उपसरपंच रघुनाथ टुपके, गणेश घाटे, राजेंद्र माने, भास्करराव वल्टे, दत्तात्रय देवकर, सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातून नासिक–मुंबई येथे जाण्यासाठी सोयीचा समजला जाणा-या नागपूर महामार्गाकडे दुर्लक्ष झाले होते. या महामार्गावर असंख्य लहान मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होवून काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.या खराब रस्त्याचा फायदा घेऊन अनेक रस्ता लुटीच्या घटना घडल्या होत्या. या खराब रस्त्याचा तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांना मोठा त्रास होत होता. या महामार्गाचे काम सुरु झाल्यामुळे पूर्व भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या जवळपास सहा किलोमीटर रस्त्यासाठी ७ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून या रस्त्याचेही काम लवकरच सुरु होणार असल्याचे आ.काळे यांनी यावेळी सांगितले.