नगर जिल्हा
खा.वाकचौरे यांनी घेतली…या केंद्रीय मंत्र्यांची भेट

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्रीय उद्योग उद्योग व पोलाद मंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी श्री साईबाबा यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे.त्यानंतर त्यांनी शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली आहे.त्यावेळी रोहित वाकचौरे हे ही उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य अधिकारी तुकाराम हुळवले यांनी सत्कार केला.जनता जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,मंदिर विष्णु थोरात,संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदि मान्यवर उपस्थित होते.
साई समाधीच्या दर्शनानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय अवजड उद्योग व पोलादमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे साहेब व युवा नेते रोहित वाकचौरे यांनी सदिच्छा भेट घेतली व मतदार संघातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.