नगर जिल्हा
…या खासदारांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकताच विजय मिळवला असून त्या निमित्त त्यांनी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली असून निवडणुकीत केलेल्या विशेष सहकार्याबाबत धन्यवाद दिले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी०४ लाख ७६ हजार ९०० मते मिळवत सत्ताधारी गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यावर ५० हजार ५२९ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहे.त्यांच्या या विजयात शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोलाची मदत केली असून त्याबाबत त्यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली आहे.
सदर प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे,सेनेचे मधुकर तळपाडे,दिलीप साळगट,रामदास गोल्हार,हरिभाऊ शेळके,सचिन बडदे,अनिल बांगरे,अशोक सातपुते,महेश उगले,राहकारी तिकांडे,मच्छीन्द्र धुमाळ,संजय फंड,सोमनाथ गोरे,संजय शिंदे,रोहित वाकचौरे,लखन भगत,राधाकिसन बोरकर,सचिन म्हसे,नितीन जगताप,सचिन कोते,शिवाजी शेटे,नितीन नाईकवाडी,संतोष मुर्तडक,भाऊसाहेब वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नवोदित खा.वाकचौरे यांच्या विजयाबद्दल शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे.व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत तर खा.वाकचौरे यांनीही उद्धव टाकरे यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा विश्वास टाकल्याबद्दल गौरव केला आहे.दरम्यान त्या नंतर खा.वाकचौरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर जाऊन पुष्प चक्र अर्पण केले याहे.