जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कोपरगाव जिल्हा होणार…नागरिकांत चर्चा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
      सध्या १५ ऑगस्ट पूर्वी शासनाने नवीन जिल्हा जाहीर करावा अशा जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून मागण्या होत असल्याने व गुणात्मक दृष्टया व नागरिकांच्या सोयीचा तालुका कोपरगाव असल्याने हेच नवीन जिल्ह्याचे योग्य ठिकाण असल्याने याबाबत शासन पातळीवर निर्णय घ्यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

०१ ऑगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर गेल्या १० वर्षांत एकही नवा जिल्हा अस्तित्वात आलेला नाही.मात्र याबाबत जानेवारीत हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना प्रश्न विचारला होता त्यात त्यांनी दिलेल्या उत्तरात,” नवीन जिल्ह्यांच्या निर्मिती संदर्भात कोणतंही धोरण आज शासनासमोर नाहीये.जिल्हा निर्मितीसाठी येणारा प्रचंड खर्च,तसंच मुख्यालयाचं ठिकाण यावरुन होणारे वाद असे अनेक प्रश्न यामध्ये येतात.पण, जिल्हा निर्मितीसंदर्भातला तसा काही प्रस्ताव शासनासमोर नाही”अशी माहिती दिली होती.

  भाषावार प्रांत रचनेची मागणी झाल्यानंतर अनेक आंदोलने झाली आणि नवीन भाषावार प्रांतरचना झाली.भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली.०१ मे १९६० रोजी २६ जिल्ह्यांचा नवीन मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य तयार झाल.त्यानंतर तब्बल वीस वर्षांच्या कालखंडात म्हणजेच तब्बल दोन दशकात आणखी दहा नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली.मात्र आजही आणखी काही जिल्हे तयार करण्याची मागणी आहे.त्यात श्रीरामपूरकर आघाडीवर आहे.मात्र या पातळीवर कोपरगाव तालुक्यात शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे.मात्र ही उणीव नुकतीच माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी भरून काढली आहे.व एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस देऊन ही मागणी केली आहे.कारण महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भरपूर मोठे जिल्हे आहेत त्यामुळे जिल्हा मुख्यालयापासून दूर राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी काही काम करायचे असल्यास त्यांचा मोठ्या प्रमाणात वेळ प्रवासात वाया जातो व तेवढे करून ही काम न झाल्यास वेगळाच मनस्ताप होतो.उदा.महाराष्ट्रातील सर्वात मोठा अहमदनगर जिल्हा.जिल्हा मुख्यालय असणाऱ्या ‘अ.नगर’ शहरापासून ‘घाटघर (भंडारदरा)’ हे गाव जवळपास १८० किमी अंतरावर आहे ज्या प्रवासासाठी जवळपास पाच तास प्रवास करावा लागेल (प्रत्यक्षात जास्तच वेळ लागेल) हे सुद्धा जर थेट वाहन असेल तर त्यामुळे जिल्हा विभाजन किती महत्वाचे आहे यावरून स्पष्ट होईल.त्यामुळे ही मागणी किती महत्वाची आहे हे उघड होते.यापूर्वी साई संस्थानचे माजी विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर यांनी समिती स्थापून ही मागणी रेटली होती.मात्र त्यानंतर त्यांनी हा विषय सोडून दिला असे दिसते.मात्र हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.त्यामुळे मंगेश पाटील यांच्या मागणी महत्वाची मानली जात आहे.


    त्यात त्यांनी म्हटले आहे की,”कोपरगाव शहरांमध्ये रेल्वे स्थानक आहे,नूतन नवीन बस स्थानक झालेले आहे.पोस्ट ऑफिस ची मोठी अद्यावत इमारत व जागाही आहे.कोपरगाव शहरालगत असलेल्या महामार्गलगत शासनाच्या जमिनी आहेत या ठिकाणी नूतन शासकीय कार्यालये होऊ शकतात.कोपरगाव शहरात पोलीस ठाण्याचे नूतन वास्तूचे काम झालेले आहे.न्यायालयीन नवीन इमारती होत आहेत.तहसील कार्यालयामध्येही नूतन ऑफिस सुरू होऊ शकतात अशी मोठी वास्तू आहे.त्यालगत पंचायत समितीची नवीन मोठी वास्तू ही आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवळूनच समृद्धी महामार्ग गेलेला असून त्यांचे शिर्डी केंद्र आहे.विमानतळ कोपरगाव तालुक्यात काकडी येथे आहे व लवकरच मालवाहतूक कार्गो सेवा ही सुरू होणार आहे.विमानतळामुळे व मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे व जुना नगर मनमाड हायवे असल्यामुळे इतर तालुक्यांसाठी दळणवळणासाठी ही व्यापार वाढीसाठी कोपरगाव हे ठिकाण अत्यंत योग्य आहे.कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्ग लगत स्मार्ट सिटी होणार आहे.कोपरगाव तालुक्याच्या लगत नूतन एम.आय.डी.सी.व कृषी विद्यापीठ होणार आहे.तालुक्यात औद्योगिक वसाहती आहे.
       पौराणिक महत्त्व असलेले जगातील एकमेव शुक्राचार्य महाराजांचे त्याच बरोबर थोर ऋषीमुनींचे साधुसंतांचे समाधी स्थान मंदिरे  हे कोपरगाव तालुक्यात आहे.गोदावरी नदी कोपरगाव शहराच्या लगत तालुक्यातून वाहत आहे.कोपरगाव तालुक्यातील उजवे डावे असे दोन्ही कालवे वाहतात व तातडीसाठी जलद कालवा असून तोही कोपरगाव तालुक्यातून जातो.

मंगेश पाटील,माजी अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

       कोपरगाव शहरापासून चारी बाजूला नाशिक,अहिल्यानगर (अ.नगर),औरंगाबाद,मालेगाव यांच्या अगदी मध्य भागात कोपरगाव येते.कोपरगाव शहराजवळच काही अंतरावरच मनमाड जवळ असल्याने व्यापाऱ्यांना दळणवळणासाठी अगदी सोयीचे आहे.
   सर्वात महत्त्वाची कोपरगाव तालुक्यात शिक्षणासाठी व उच्च शिक्षणासाठी अद्यावत असे शाळा,महाविद्यालये मुला मुलींच्या शिक्षणासाठी आहेत.यात आर्ट्स,कॉमर्स,सायन्स कॉलेज,तसेच एम.बी.ए,बी फॉर्म,एम फॉर्म,इंजीनियरिंग,आयुर्वेदिक होमिओपॅथिक,नर्सिंग असे उच्च शिक्षणासाठी लागणारी शैक्षणिक  संस्था आहेत.नवीन हॉस्पिटलही मोठ्या प्रमाणात कोपरगावा लगत  झाले आहे व होत आहेत.राहण्यासाठी दिवसासाठी शांत चांगले असे हे गाव आहे.
            इतर तालुक्यांपेक्षा जिल्हा होण्यासाठी कोपरगाव हे अगदी योग्य सोयीचे गुणात्मक ठिकाण आहे.त्यामुळे कोपरगावातील जनतेला इतर तालुक्यांप्रमाणे गाव बंद ठेवून तालुका बंद ठेवून मागणी करण्याची गरज नाही.त्यामुळे या शासनाने १५ ऑगस्ट पूर्वी जिल्ह्याचे विभाजन व्हावं असे इतर तालुक्यातून जरी मागणी होत असली तरी भौगोलिक दृष्ट्या कोपरगाव हेच जिल्ह्याचे ठिकाण होण्यास योग्य असल्याने शासनाने कोपरगाव जिल्हा घोषित करावा व कोपरगाव जनतेला न्याय द्यावा.जेणेकरून जिल्हा झाल्यानंतर कोपरगाव चे भाग्य उजळेल व व्यापार धंदा वाढीसाठी युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व इतर तालुक्यांतील नागरिकांना कोपरगाव या नूतन जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी हे सर्वात सोयीचे होणार असल्याने कोपरगाव हेच जिल्ह्याचे ठिकाण म्हणून घोषित करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी शेवटी केली आहे.त्यांच्या या मागणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close