जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

खालच्या पायरीवर यायला भाग पाडू नका-अध्यक्ष वहाडणेंचा इशारा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव-(प्रतिनिधी)

जागतिक महिला दिनानिमित्त आपण एखाद्या जेष्ठ नगरसेविकेला अध्यक्षपदाची संधी दिली तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण नाही.सर्व पदे आपल्याच घरात घालणाऱ्यांना या विषयी काहीही बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी उगीच नगरपरिषदेच्या राजकारणात चुबुक-डुबुक करवून आपली प्रतिष्ठा पणाला लावू नये व आपल्याला खालच्या पायरीवर यायला भाग पडू नये अन्यथा आपण तुमचे सर्व कर्तृत्व जनतेसमोर ठेऊन तुम्हाला जनतेसमोर यायला नाक ठेवणार नाही असा गंभीर इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकताच दिला आहे.

महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.मात्र ८ मार्चला रविवार असल्याने हा महिला दिन साजरा करता आला नाही.म्हणून आपण तो ९ मार्च रोजी घेतला व एका जेष्ठ नगरसेविका व विशेष म्हणजे या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती या कोल्हे गटाच्याच होत्या हे विशेष ! तरीही आ. काळे गटाच्या किंवा शिवसेनेच्या महिला नगरसेविकांना आपण डावलून आपण जेष्ठतेच्या नात्याने या महिलेला आपण अध्यक्षपदाचा मान दिला यात आपले काय चुकले ?

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात`द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने`सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा`जागतिक महिला-दिन’म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला तो पास झाला.

शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बनवता येते.जिल्हाधिकारी आपला कार्यभार विद्यार्थ्यांना देऊ शकतात तर अध्यक्षपदाचा कार्यभार देणे यात गैर काय ? व नेत्यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? असा सवाल अध्यक्ष वहाडणे यांनी विचारला आहे.व पद सोपवलेल्या नगरसेविका या जात्यात तर बाकी नगरसेवक हे सुपात आहे हे त्यांना आता तरी उमजायला हवे-वहाडणे

महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.मात्र ८ मार्चला रविवार असल्याने हा महिला दिन साजरा करता आला नाही.म्हणून आपण तो ९ मार्च रोजी घेतला व एका जेष्ठ नगरसेविका व विशेष म्हणजे या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती या कोल्हे गटाच्याच होत्या हे विशेष ! तरीही आ. काळे गटाच्या किंवा शिवसेनेच्या महिला नगरसेविकांना आपण डावलून आपण जेष्ठतेच्या नात्याने या महिलेला आपण अध्यक्षपदाचा मान दिला यात आपले काय चुकले ? मात्र तरीही काहींच्या पोटात पोटशूळ उठले व त्यांनी विनाकारण वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून त्याच्या उलटसुलट चौकशा सुरु केल्या यात या नेत्यांची कुपमंडूक वृत्ती दिसून आली आहे.जेष्ठ महिलेला मिळालेली हि वागणूक बाकी नगरसेवकांना अंतर्मुख करणारी ठरली आहे.

या नेत्याना आपल्या घरात सर्व पदे लागतात त्यात मग पंचायत समिती,जिल्हा परिषद,जिल्हा बँक,साई संस्थान,नॅशनल हेवी इंजिनिअरिंग,रयत शिक्षण संस्था,एस.एस.जी.एम.महाविद्यालय,शैक्षणिक संस्था,औद्योगिक वसाहत,राज्य सहकारी बँक,दूध संघ,साखर कारखाना,बुडीत घटलेला कुक्कुट उद्योग,सपकॉम आदी प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत.त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी यांच्या आपमतलबी विचारांचा जरूर बेत पाहायला हवा असे आवाहन करून बाकी कार्यकर्त्यांनी केवळ आयुष्यभर केवळ यांचे जोडे उचलायचे व यांच्या दादांच्या पालख्या वहायच्या का ? व तिसऱ्या पिढीतील “युवराजांना” चवऱ्या ढाळायच्या काय ?-वहाडणे

वास्तविक शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बनवता येते.जिल्हाधिकारी आपला कार्यभार विद्यार्थ्यांना देऊ शकतात तर अध्यक्षपदाचा कार्यभार देणे यात गैर काय ? व नेत्यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय ? असा सवाल अध्यक्ष वहाडणे यांनी विचारला आहे.व पद सोपवलेल्या नगरसेविका या जात्यात तर बाकी नगरसेवक हे सुपात आहे हे त्यांना आता तरी उमजायला हवे.आपण कधीही प्रसिद्धीचा,मानाचा हट्ट धरला नाही.तो दुसऱ्यांनाच देत गेलो.या नेत्याना आपल्या घरात सर्व पदे लागतात त्यात मग पंचायत समिती,जिल्हा परिषद,जिल्हा बँक,साई संस्थान,नॅशनल हेवी इलेक्ट्रिकल,रयत शिक्षण संस्था,एस.एस.जी.एम.महाविद्यालय,शैक्षणिक संस्था,औद्योगिक वसाहत,राज्य सहकारी बँक,दूध संघ,साखर कारखाना,बुडीत घटलेला कुक्कुट उद्योग,सपकॉम आदी प्रातिनिधिक उदाहरणे दिली आहेत.त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी यांच्या आपमतलबी विचारांचा जरूर बेत पाहायला हवा असे आवाहन करून बाकी कार्यकर्त्यांनी केवळ आयुष्यभर केवळ यांचे जोडे उचलायचे व यांच्या दादांच्या पालख्या वहायच्या का ? व यांच्या तिसऱ्या पिढीतील “युवराजांना” चवऱ्या ढाळायच्या काय ? असा रास्त सवाल विचारला आहे.संगमनेर तालुक्यात सामान्य माणूस कारखान्यांचा अध्यक्ष होण्यापासून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकतो तर हीच बाब कोपरगावात का होऊ शकत नाही.याचा आता त्यांच्या समर्थकांनी विचार करायला हवा.गत विधानसभा निवडणुकीत बऱ्याच पदाधिकाऱ्यांना याचे शल्य बोचलेलेलं पाहायला मिळाल्याने शहरात मताधिक्य घटले असल्याचा पुरावा मिळाला आहे.यांच्या कार्यकर्त्यांनीं आता यांच्या ‘पालखीचे भोई’ होण्याचे थांबवले आहे.या पुढे आजच्या कृतीतून त्याचा सत्ताधाऱ्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही अध्यक्ष वहाडणे यांनी व्यक्त केला आहे.आपण यांच्या महिला उमेदवाराला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मदत केल्याने त्यांना त्या खुर्चीपर्यंत पोहचता आले. याचे त्यांना खुर्ची मिळताच विस्मरण झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. निवडून आलेल्या महिला आमदाराकडे गत नगरपालिका आपल्याला उमेदवारी मागूनही ती दिली नाही म्हणून निवडणुकीत घराणेशाहीला शहरातील मतदारांनी आपल्याला निवडून देऊन जोरदार चपराक लगावली आहे.पुढे विधानसभेतही नाकारलेले आहे.आपण स्वच्छ मनाने ‘महिला दिना’ निमित्त कृती करून व त्यांच्याच महिलेला संधी देऊन त्यांनी आपल्याला डिवचायचे काहीएक कारण नसताना नसते उद्योग केले आहे.एका माहिलेचाच अपमान केला असल्याचे उघड केले आहे.आपल्याला संघर्ष नवा नाही.यांच्या सदस्यांचे अनुभव सांगितले तर यांची जाहीर पंचायत होऊन जाईल.गमवायला आपल्याकडे काही नाही याचा विचार केलेला बरा असा शेवटी इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close