नगर जिल्हा
गुरुदत्त इंग्लिश मिडीयम मध्ये शिव जयंती उत्साहात

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले होते.शिव चरित्र व्याख्याते देशमुख सर यांनी मुलांना शिव जयंती ची माहिती सविस्तरपणे समजावून सांगितली. कार्यकारी संचालक स्वप्नील भवर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य दीपक चौधरी,शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.