कोपरगाव तालुका
कर्मवीर काळे कारखान्यावर शिवजयंती उत्साहात साजरी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांना उपस्थितांनी अभिवादन केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,समूह व्यस्थापक सुनील कोल्हे सचिव बाबा सय्यद,उपसचिव एस. डी. शिरसाठ कार्यव्यवस्थापक दौलतराव चव्हाण,मुख्य अभियंता निवृत्ती गांगुर्डे,मुख्य रसायन तज्ज्ञ सुर्यकांत ताकवणे, मुख्य लेखापाल सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे आदी मान्यवारांसह उद्योग समुहातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.