जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

समताने आता जागतिक नेतृत्व स्वीकारावे-रणजित हेत्तीयारी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावात ओमप्रकाश कोयटे यांनी स्थापन केलेली समता पतसंस्थेने आधुनिक सर्व प्रणाली दैनंदिन जीवनात आत्मसात केल्याने या संस्थेने आता जागतिक सहकारी पतसंथा चळवळीत नेतृत्व स्वीकारावे असे आवाहन असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फड्रेशन क्रेडिट युनियनचे थायलंडचे अध्यक्ष रणजित हेत्तीयारी यांनी शिर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

यावेळी श्रीमती इलेनीता संड्रॉक म्हणाल्या कि, एशियन सिस्टर सोसायटी आशिया खंडात महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असून महिला आज आपले कुटुंब स्वतःच्या बळावर चालवू शकतात असे त्या म्हणाल्या. त्याचा लाभ कोपरगावातील महिलांना मिळवून देण्यात आम्हाला समाधान मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाचे नुकतेच शिर्डीत आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्यांनी कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेस भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फड्रेशन क्रेडिट युनियनच्या कार्यकारी अधिकारी इलेनीता संड्रॉक, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, समता पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र बागरेचा, संचालक गुलाबचंद अग्रवाल, मोहनशेठ झंवर, जितुभाई शहा, संदीप कोयटे, गुलशन होडे, श्वेता अजमेरे, समता स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे, लिसा बर्धन, समीर अत्तार, लिओ क्लबचे अध्यक्ष कुलदीप कोयटे,नेटवींचे संचालक उत्तम घाटगे, मसूद अत्तार, कोपरगाव अल्पबचत गटाच्या अध्यक्ष किरण दगडे, महिमा ठोळे, राजश्री गुजराथी, श्रद्धा शिंदे, रुपाली अमृतकर, किरण डागा, राधिका देवकर, प्रतिभा विध्वंस,कोमल गंगवाल,आदी प्रमुख मान्यवरांसह समता पतसंस्थेचे समूह व्यवस्थापक सचिन भट्टड, व अल्पबचत गटाचे अधिकारी,कर्मचारी समताचे कोपरगाव शाखेचे व्यवस्थापक योगेश मोरे,आदींसह बहुसंख्येने सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले कि,समताच्या व्यवस्थापनाने ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करून कागदावीना व्यवहार करण्यात मोठे यश मिळवले आहे.ऑनलाइन व्यवहार करून ए. टि. एम. मोबाईल बँकिंग, कोअर बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आर.टी. जी.एस.,फंड ट्रान्सफर. एन.ई. एफ.टी., आदी सुविधा पुरवून आपण या क्षेत्रात प्रगतशील व आधुनिक व सर्वात पुढारलेले असल्याचे दाखवून दिले आहे.व महिलांना स्वयंपूर्ण करण्यात अहंम भूमिका निभावत असल्याचे कौतुक केले आहे.

या वेळी रणजित हेत्तीयारी यांच्या हस्ते समता नागरी पतसंस्थेच्या संचालकांच्या मिटिंग हॉलचे उदघाटन करण्यात आले.त्यावेळी उपस्थित मान्यवरांचे ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,शाल,हार, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक ओमप्रकाश कोयटे यांनी केले आहे.सुत्रसंचलन उज्वला बोरावके यांनी केले,तर उपस्थितांचे आभार समूह व्यवस्थापक सचिन भट्टड यांनी मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close