कोपरगाव तालुका
कासली शिवारात पुन्हा चोरी,अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील रस्ता लुटी आणि चोऱ्यांच्या सत्र थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही कोपरगाव तालुक्यातील कासली ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच तेथील शेतकरी दिलीप बापूसाहेब भगुरे (वय-६०) यांच्या शेताचा गट क्रमांक १२२/१ मधून काही अज्ञात चोरट्याने बुधवार दि.१२ फेब्रुवारीच्या रात्री शेतात कोणी नाही याची संधी साधत शेतातील १० हजार रुपये किमतीचा तुषार सिंचन संच चोरून नेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव शहर व तालुका पोलिसानी वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोऱ्या करणाऱ्या व रस्ता लूट करणाऱ्या दोन चोरांच्या टोळ्या गजाआड केल्या असल्या तरी अद्याप काही टोळ्या कार्यरत आहेत.त्यामुळे कोपरगाव पोलिसांची झोप उडाली आहे.कासली येथे मागच्या पंधरवड्यात एका शासकीय लेखा परिक्षकाची ते बाहेरगावी असताना घरफोडी झाली होती अद्याप त्या चोरीचा तपास लागलेला नाही.त्यातच पुन्हा एकदा चोरट्याने आपल्या लीला दाखवून दिल्या आहेत.तेथील शेतकरी दिलीप भगुरे यांच्या शेतात आपल्या शेताला तुषार सिंचनाने पाणी देण्यासाठी उपयोगात येत असलेल्या तुषार सिंचन संचावरच चोरट्यांनी वक्र दृष्टी पडली असून त्यांनी बुधवारी मध्यरात्री शेतात कोणी नाही हि संधी साधत आपला करिश्मा दाखवला आहे.या बाबत शेतकरी दिलीप भगुरे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गु र.नं.४७/२०२० भा.द.वि.कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पवार हे करीत आहेत.