जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

..त्या आयाराम नेत्यांमुळे भाजपची लागली वाट-प्रा.शिंदे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गत दहा-बारा वर्षांपासून कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी भारतीय जनता पार्टीचे संघटन आयाराम नेत्यांच्या हाती देऊ नये व पक्षसंघटन निष्ठावंतांच्या हातात रहावे यासाठी पक्षांतर्गत संघर्ष केला.मात्र त्याला त्यावेळी सत्तेच्या धुंदीत तत्कालीन पालकमंत्र्यांना चटके बसले नाही आता चटके बसूनही वेळ निघून गेली आहे त्यामुळे आकांडतांडव करण्यात काही एक उपयोग नसल्याचे प्रतिपादन भाजपचे माजी शहराध्यक्ष सुभाष शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये नुकतेच केले आहे.

पक्षातील ठराविक गटाने संघटनेला महत्व न देता स्वतःचे हितसंबंध जपले.आज त्याची विषारी फळे भारतीय जनता पक्षाला चाखावी लागत आहे.जिल्ह्यात मूळ भाजपाचा एकही आमदार-खासदार नाही.जे आहेत ते बाहेरुन आलेलेच आहेत.संघ-जनसंघ-भाजपा चे प्रामाणिक-एकनिष्ठ कार्यकर्ते उपेक्षित आहेत.काहींना फक्त स्वार्थच माहित असल्याने दुरावस्था झालेली दिसते. तरीही पक्ष नेतृत्वाला जाग यायला तयार नाही.

भाजप हा पक्ष २०१४ साली सत्तेत आला होता त्यावेळी सत्तेत येताना कुठलाही विधिनिषेध पाळला गेला नाही सत्तेच्या हव्यासापोटी फडणवीस सरकारने आयारामांचे ढोल बडवून जंगी स्वागत केले.त्यांनतर या सरकारचा अहंकार इतका पराकोटीला गेला कि,आता राज्यात विरोधकांचा आखाड्यात उरला नाही इथपर्यंत मजल गेली होती.मात्र विधानसभा निवडणुकीनंतर चित्र स्पष्ट झाल्यावर सगळ्याच नेत्यांचे वारू जमिनीवर उतरले.मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.जिल्ह्यात वेगळी स्थिती नव्हती पक्षातील ठराविक गटाने संघटनेला महत्व न देता स्वतःचे हितसंबंध जपले.आज त्याची विषारी फळे भारतीय जनता पक्षाला चाखावी लागत आहे.जिल्ह्यात मूळ भाजपाचा एकही आमदार-खासदार नाही.जे आहेत ते बाहेरुन आलेलेच आहेत.संघ-जनसंघ-भाजपा चे प्रामाणिक-एकनिष्ठ कार्यकर्ते उपेक्षित आहेत.काहींना फक्त स्वार्थच माहित असल्याने दुरावस्था झालेली दिसते. तरीही पक्ष नेतृत्वाला जाग यायला तयार नाही.कुठल्याही पदाची-मानाची अपेक्षा केली नसतांनाही विजय वहाडणे यांना टाळण्यासाठी एक गट कार्यरत राहिला.पण प्रामाणिक कार्यकर्त्याला पक्षाने ओळखले नाही,पण सामान्य जनतेने मात्र ओळखले.विजय वहाडणे यांना टाळणारे,अडथळे आणणारे आज जनतेने घरात बसविले. पण मतदारांच्या कृपेने विजय वहाडणे मात्र कोपरगाव या मोठ्या शहराच्या नगराध्यक्ष पदावर आहेत.गेल्या तीन वर्षात विजय वहाडणे यांनी राज्य शासन,माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे कोपरगाव शहराचा विकास व्हावा यासाठी अनेक प्रस्ताव दिले.परंतु माजी आ.कोल्हे यांना खुश ठेवण्यासाठी विजय वहाडणे यांचे कुठलेही प्रस्ताव मान्य केले नाहीत.कोपरगावच्या मतदारांनीही याची शिक्षा विधानसभा निवडणुकीत भाजपाला दिली.आता तरी पक्ष नेतृत्वाने कार्यपद्धतीत बदल करणे अपेक्षित आहे.अन्यथा प्रामाणिक कार्यकर्ते येणाऱ्या सर्वच निवडणुकात आयारामांचा व त्यांच्या पाठीराख्या नेत्यांचा पराभव केल्याशिवाय राहाणार नाहीत. जोपर्यंत पक्ष संघटन व उमेदवाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याना मिळत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्ष अहमदनगर जिल्ह्यात मजबूत होऊच शकत नाही असा दावाही प्रा.सुभाष शिंदे यांनी शेवटी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close