जाहिरात-9423439946
खेळजगत

शिरसगाव येथे क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन  

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २०१९ – २० वार्षिक क्रीडा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोपरगाव येथील संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल चे क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र पाटणकर व कोपरगाव भारतीय आयर्विमा महामंडळाचे शाखा व्यवस्थापक दीपक काळे यांच्या हस्ते पार पडले.

क्रीडा विभाग प्रमुख राजेंद्र पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे महत्त्व पटवून देताना म्हणाले की आज मोबाईलच्या अती वापरामुळे मुलं मैदानी खेळ विसरत चालले आहे.म्हणून जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळल्याने आपले आरोग्य नेहमी निरोगी राहते. यानंंतर भारतीय आयर्विमा महामंडळाचे कार्यालयीन अधिकारी प्रमोद डोंगरे,यांनी पण विद्यार्थ्यांना खेळाबद्दल मार्गदर्शन केले. या उद्घाटन कार्यक्रमावेळी कोपरगाव येथील आयर्विमा महामंडळाचे विकास अधिकारी,संस्थेचे प्राचार्य दिपक चौधरी, तसेच संस्थेचे संस्थापक केशवराव भवर आदी प्रमुख मान्यवरांसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close