जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

…..या गावातून झाली सप्तशृंगी गडासाठी दिंडी रवाना,अनेक भाविक सामील

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील अमरदीप युवक संघटना व सावळीविहीर बुद्रुक ग्रामस्थ यांच्या वतीने सावळीविहीर ते वणी सप्तशृंगी गड अशी दिंडी बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सावळीविहीर येथून सप्तशृंगी गडाकडे मोठ्या उत्साहात रवाना झाली आहे.या पदयात्रेचे हे 26 वे वर्ष ,आहे, या पदयात्रेला निरोप देण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ ही यावेळी उपस्थित होते.

सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या . ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे.या गडावर राज्यभरातून दर्शनासाठी दिंड्या येत असतात.

दरवर्षाप्रमाणे यावर्षीही अमरदीप युवक संघटना व सावळीविहीर बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने सावळीविहीर बुद्रुक येथून बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी येथील श्री हनुमान मंदिर प्रांगणात या दिंडीच्या रथाचे व श्री सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचे राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे ,पंचायत समितीचे सदस्य ओमेश जपे, माजी सरपंच सोपान पवार, गणेश आगलावे ,जिजाबा आगलावे, रमेश आगलावे, राजेंद्र गडकरी ,शांताराम जपे, कैलास पळशी, चंद्रशेखर जपे ,संतोष पळसे ,शिवसेना सावळीविहिर शाखाप्रमुख दिनेश आरणे ,रवींद्र कापसे ,निलेश आरणे, आदींच्या हस्ते पूजन केल्यानंतर श्रीदेवी मातेची आरती व देवीचा जयजयकार करून या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येऊन ही पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने श्री सप्तशृंगी गडाकडे रवाना झाली आहे.

यावेळी अनेक भाविक महिला व ग्रामस्थांनी या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या, या पदयात्रेत सुमारे पन्नास-साठ पदयात्री सामील झाले असून ही पदयात्रा चासनळी, नैताळे ,उगाव, रानवड, शिरवाडे, वडनेर भैरव, बहादुरी, संगमनेर व चितखडा मार्गे श्री सप्तशृंगी गडावर जाणार आहे ,ही पदयात्रा सात डिसेंबर रोजी संध्याकाळी गडावर पोहचणार आहे ,या पदयात्रेचे हे 26 वे वर्ष असून या पदयात्रेत स्वच्छता मोहिमेला ही मोठे प्राधान्य देण्यात येणार आहे, या पदयात्रे साठी शरद गडकरी, अक्षय चव्हाण ,सागर जपे ,अमोल जिरे, गणेश पवार,साईश गडकरी, शरद पवार, भारत थोरात आदी पदयात्री परिश्रम घेत आहेत, या पदयात्रेत राहुल डोखे, लाला दहिवाळ, फकिरा लोढा ,नाना दीक्षित, बाळासाहेब काशीद, गणेश पाचोरे, संदीप विघे तसेच बबनराव माळी, निफाडे पाटील, जाधव पाटील व श्री सप्तशृंगी देवस्थान आदींचीही मोठे सहकार्य मिळणार आहे.रस्त्याने या पदयात्रेचे तीन मुक्काम होणार असून चौथा मुक्काम गडावर होणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close