जाहिरात-9423439946
अपघात

‘त्या’अपघातातील तरुण अखेर ठार,कोपरगाव पोलिसांत नोंद !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव,’जलजीवन मिशन योजने’चे चांदगव्हाण येथे जुनी टाकी पाडण्याचे काम जे.सी.बी.च्या सहाय्याने सुरु असताना दि.०१ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात सचिन गीते सह त्यांचा अन्य एक सहकारी जखमी झाले होते.त्यास नाशिक येथील रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार सुरु असताना त्यात गीते (वय-२८) रा.जेऊर पाटोदा याचे निधन झाले असल्याने कोपरगाव शहर पोलिसांनी आज दुपारी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दि.०१ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास चांदगव्हाण येथे जुन्या टाकीचे पाडण्याचे काम एका जे.सी.बी.च्या सहाय्याने सुरु केले असताना त्यातून सदर जुनी टाकी हि थेट या सयंत्रावर कोसळली होती.त्यात सचिन मधुकर गीते हा तरुण चालकाशेजारी बसला असताना जखमी झाला होता.त्यावर नाशिक येथे उपचार सुरु असताना त्याचे नुकतेच निधन झाले आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,’हर घर जल’ या संकल्पनेसह,भारत सरकारने २०२४  पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले आहे.या योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील धारणगाव प्रादेशिक नळ पाणी पूरवठा योजनेचे काम सुरु आहे.त्या अंतर्गत चांदगव्हाणसह पाच गावांचा समावेश आहे.

मयत तरुण सचिन गीते याचे छायाचित्र.

त्यात चांदगव्हाण येथील मारुती मंदिराच्या जवळ पश्चिमेस एक साधारण १९९५-९६ साली,’अश्वरोध’ या योजनेतून सुमारे २५ हजार लिटर क्षमतेची बांधलेली पाण्याची उंच टाकी होती.’जलजीवन मिशन’ मध्ये सदर गावात नवी योजना जीवन प्राधिकरण यांचे मार्फत मंजूर झालेली होती.त्या अंतर्गत जुनी टाकी पाडून त्या जागी नवीन टाकी बांधण्याचे काम सुरु होते.तथापि त्यास नवी जागा नसल्याने ग्रामपंचायतीने जुनी टाकी पाडण्याचा निर्णय घेतला होता.

सदरचे काम हे जीवन प्राधिकरण कोपरगाव उपविभाग यांचे मार्फत,गुजरात येथील ठेकेदार,’जयंती सुपर कन्स्ट्रक्शन’ या कंपनी कडे सोपवले असल्याची माहिती हाती आली होती.त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाची परवानगी घेऊन सदर टाकी पाडण्याचे काम दि.०१ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सुरु होते.सदरचे काम संबंधित ठेकेदाराने एका जे.सी.बी.च्या सहाय्याने सुरु केले असताना त्यात त्यांनी थेट जे.सी.बी.च्या सहाय्याने त्यास पाडण्याच्या आततायी प्रयत्न केला होता अशी माहिती प्रथम दर्शनी पाहणाऱ्या ग्रामस्थानीं दिली होती.त्यातून सदर टाकी हि थेट जे.सी.बी.या सयंत्रावर कोसळली होती.त्यात सचिन मधुकर गीते हा चालकाशेजारी बसला होता असा दावा केला होता.दरम्यान  त्यात तो गंभीर जखमी झाला होता.दरम्यान त्याच्या बरोबर एक अन्य सहकारी असल्याची माहिती आहे.मात्र त्याचे नाव  उघड झाले नव्हते.तथापि त्यास प्रथम शिर्डी येथील रुग्णालयात व नंतर गंभीर जखमी असल्याने त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात भरती केले होते.त्यात उपचार सूरु असताना त्यात त्याचे दि.०९ सप्टेंबर २०२३ रोजी निधन झाले आहे.तो अविवाहित होता.त्याच्या पश्चात आई,वडील,व एक भाऊ असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान सदर घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचेसह भरत दाते यांनी भेट दिली होती.

या बाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आज दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान अकस्मात मृत्यूची नोंद क्रं.५४/२०२३ या अन्वये आपल्या दप्तरी नुकतीच दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाते हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close