जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संत जगनाडे महाराज जयंती शासकीय कार्यालयात साजरी करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक परिपत्रक काढून त्यात राज्यातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयात संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती येत्या रविवार दि.8 डिसेंबर रोजी साजरी करावी असे आदेश दिले असून त्याची कोपरगाव तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी अंमलबजावणी करावी अशी मागणी कोपरगाव शहर व तालुका समस्त तेली समाजाच्या कार्यकर्त्यांनी काल कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना भेटून व निवेदन देऊन आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास केली आहे.

संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता ते त्या काळातील काही भटांना सहन होत नव्हता कारण त्यामुळे त्यांच्या व्यवसाय कमी होत होता व त्यावेळी संत श्री तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोत्गत पाठ होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.यावरून संत जगनाडे महाराज यांचे महत्व समजून येण्यास पुरेसे मानले पाहिजे.

अशा लोकोपकारी संतांची जयंती साजरी करणे हे नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी अध्यात्मिक क्षेत्रातील दुर्मिळ उदाहरण असल्याने शासनाने त्या मागणीची उचित दाखल घेऊन या तेली समाज संघटनेची मागणी उचित ठरविल्यास वावगे म्हणता येणार नाही.त्याला कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.सदर प्रसंगी तेली समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक रमेश गवळी,संतोष शेलार,रामदास गायकवाड, विलास वालझाडे, राजेंद्र सोनवणे, राजेश वालझाडे,राजेंद्र व्यवहारे,बाबासाहेब कर्डीले,प्रमोद कवाडे, विजय सोनवणे, सागर राऊत,किरण व्यवहारे, स्वप्नील सोनवणे, सिद्धार्थ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close