कोपरगाव तालुका
ज्येष्ठ नागरिकांनी राबविले…या गावात स्वच्छता अभियान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत स्वच्छता अभियान हे भारताच्या ४ हजारहून अधिक शहरांच्या, रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरु केलेला राष्ट्रीय पातळीवर अभियान आहे. हे अभियान २ ऑक्टोबर २०१४ रोजी राजघाट, नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झाले. त्यांनी स्वत: रस्त्याला स्वच्छ केले. मोदी म्हणाले,”महात्मा गांधींना सर्वात मोठे स्मारक म्हणजे २०१९ मध्ये त्यांच्या १५० व्या जयंतीला त्यांची स्वच्छ भारताची इच्छा साध्य करणे होय. हे भारताच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान मानले जात आहे.
याप्रसंगी परिसरातील कचरा ,धूळ,प्लास्टिक पिशव्या आदी कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.सदर स्वच्छता अभियान मध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह लक्षवेधी स्वरूपाचा होता .या अभियानात तरुण व ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता.याप्रसंगी प्रेरणा फाऊडेशनचे अध्यक्ष मनोज कडू, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष अरविंद ससाणे,,सुवालाल भंडारी,शरद घाटे,छबुराव नजन,बबनराव वाघ,,मोहनलाल तिवारी,सुधाकर मोरे,नंदकुमार मेहेर, दिलीप वाघ ,चिने सर,श्रीकांत जोशी,औताडे, राजेभोसले,महानुभाव सर,मुस्तफा शेख,सोमनाथ गायकवाड,दौलत शिरसाठ, आदी मान्यवर उपस्थित होते.