जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

  स्व.जोंधळे गुरुजींचे नाव सार्थ ठरवले-…यांचे गौरवोद्गार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
  
     कोपरगाव तालुक्यातील आदर्श शिक्षक व माजी आ.स्व.के.बी.रोहमारे यांचे सहकारी स्व.पंढरीनाथ जोंधळे यांचे नातू अभिषेक जोंधळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन व पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड होऊन गुरुजींचे नाव सार्थ ठरवले असल्याचे गौरवोद्गार गोदावरी-नामदेवराव परजणे तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच जवळके येथे बोलताना केले आहे.

   

“स्व.जोंधळे गुरुजी यांनी कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवले होते.त्यांचा धाक तत्कालीन विद्यार्थ्यांमध्ये होता त्यामुळे अनेकांचे भविष्य घडविले होते.त्यांना तालुक्यात सर्वत्र आदर होता.त्यांचे नाव उज्वल करण्याचे काम अभिषेक जोंधळे यांनी व जेष्ठ बंधू सागर जोंधळे यांनी केले आहे”-नानासाहेब जवरे,संस्थापक निळवंडे कालवा कृती समिती,अ.नगर-नाशिक.

कोपरगाव तालुक्यातील बहादराबाद येथील रहिवासी व हॉलीबॉलपटु मिननाथ जोंधळे यांचे कनिष्ठ चिरंजीव अभिषेक जोंधळे याने नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा-२०२१ हि राज्यात ०९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आज सकाळी ९.३० वाजता जवळके येथे गोदावरी-नामदेवराव परजणे तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या हस्ते जवळके येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

    सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,जलसंपदाचे सेवानिवृत्त उपअभियंता एस.के.थोरात,गोदावरी परजणे तालुका दुध संघाचे संचालक भिकाजी झिंजुर्डे,माजी संचालक यशवंत गव्हाणे,सिताराम कांडेकर,राज्य विक्रीकर उपायुक्त सागर जोंधळे,मिनानाथ जोंधळे,पोपटराव जोंधळे,दत्तात्रय थोरात,भाऊसाहेब जोंधळे,जवळके ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका विजय थोरात,प्रल्हाद गाढे,माजी सरपंच माणिक दिघे,माजी उपसरपंच अण्णासाहेब भोसले,विजय थोरात,विजय शिंदे,जवळके ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब थोरात,नवनाथ शिंदे,रखमा वाकचौरे,काळु थोरात,तात्या गव्हाणे,पंकज जोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

   सदर प्रसंगी नानासाहेब जवरे यांनी स्व.जोंधळे गुरुजी यांच्या कार्याचा आढावा घेतला ते स्व.माजी आ.के.बी.रोहमारे यांचे सहकारी होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवले होते.त्यांचा धाक तत्कालीन विद्यार्थ्यांमध्ये होता त्यामुळे अनेकांचे भविष्य घडविले होते.त्यांना तालुक्यात सर्वत्र आदर होता.त्यांचे नाव उज्वल करण्याचे काम अभिषेक जोंधळे यांनी व जेष्ठ बंधू सागर जोंधळे यांनी केले आहे.या दोन्ही बंधूना आगामी काळात दुष्काळी भागातील तरुणांना मार्गदर्शन करून भावी पिढी घडविण्याचे काम करावे लागणार आहे.त्यासाठी जवळके ग्रामपंचायत व जनमंगल ग्रामविकास संस्था त्यांचे सहकार्य घेणार असल्याचे शेवटी सांगीतले आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक अण्णासाहेब भोसले यांनी केले तर सुत्रसंचलन विजय थोरात यांनी केले आहे.तर आभार विजय शिंदे यांनी मानले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णासाहेब भोसले,विजय थोरात,विजय शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close