गुन्हे विषयक
कोपरगावात वहानचोरी पून्हा एकदा उघड,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली असून कारवाडी येथील कर्मवीर काळे साखर कारखान्याचे कामगार दिगंबर होले यांची आपली १० हजार रुपयांची काळ्या पांढऱ्या रंगाची हिरो होंडा कंपनींची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी कारखान्याच्या मुख्यप्रवेश द्वारापासून चोरून नेली असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाहन धारकांत खळबळ उडाली आहे.
कारवाडी येथील फिर्यादी दिगंबर सदाशिव होले (वय-४३) यांनी आपली सुमारे १० हजार रुपये किमतीची लाल काळा रंगाचा पट्टा असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस हि दुचाकी (क्रं.एम.एच.१५ बी.के.८७७०) हि दि.१६ मार्च रोजी रात्री ०८ वाजेनंतर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वारातून चोरी गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत.त्यात चाकी व दुचाकी वहाने आदींचा समावेश आहे.त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान अशीच घटना तालुक्यातील रवंदे येथे घडली होती.तेथील महिला शालिनी संजय कदम (वय-४७) यांची १० हजार रुपये किमतीची शेळी दि.१३ मार्चच्या रात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली होती.या बाबत त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता मात्र पोलिसांनी काही तासात त्याचा शोध लावला असताना कारवाडी येथील फिर्यादी दिगंबर सदाशिव होले (वय-४३) यांनी आपली सुमारे १० हजार रुपये किमतीची लाल काळा रंगाचा पट्टा असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस हि दुचाकी (क्रं.एम.एच.१५ बी.के.८७७०) हि दि.१६ मार्च रोजी रात्री ०८ वाजेनंतर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वारातून चोरी गेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे दुचाकी आणि चार चाकी चोरांचा बंदोबस्त अद्याप झाला नसल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे वहानधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी नोंद क्रं.१३५/२०२३ भा.द.वि.कलम-३७९ अन्वये नुकतीच नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ना.आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.