जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

घर बांधण्यासाठी महिलेचा छळ,कोपरगावात चार जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत शिवारात रहिवासी असलेल्या महिलेला तिचा नवरा अतुल उत्तम जाधव,सासू मंदा उत्तम जाधव,नणंद अश्विनी ज्ञानेश्वर बलकवडे,भाया राहुल उत्तम जाधव सर्व रा.लोहगाव,पुणे आदींनी घर बांधण्यासाठी माहेराहून ०१ लाख रुपये आणावे यासाठी तिचा गत चार वर्षापासून शारीरिक,मानसिक छळ करून,उपाशी पोटी ठेवून तिला शिवीगाळ,दमदाटी करून मारहाण केल्या प्रकरणी बाधित महिला प्राजक्ता अतुल जाधव (वय-२८) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोळपेवाडी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

दिवसेंदिवस समाज प्रगत होत असला तरी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या,छळाच्या घटना,त्यांनी दिली जाणारी दुय्यम वागणूक,त्यांचा केला जाणारा शारीरिक आणि मानसिक छळ याविषयीच्या अनेक गोष्टी कायम समोर येत असतात.महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी त्यांच्या बाजूने प्रभावी कायदे करण्यात आले असताना अद्यापही ते कमी होण्याची चिन्हे दिसत नाही अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत विवाहित महिला प्राजक्ता अतुल जाधव हिचे बाबतीत घडली आहे.

समाज कितीही सुधारला,प्रगत झाला असला तरी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या,छळाच्या घटना,त्यांनी दिली जाणारी दुय्यम वागणूक,त्यांचा केला जाणारा शारीरिक आणि मानसिक छळ याविषयीच्या अनेक गोष्टी कायम समोर येत असतात.महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी त्यांच्या बाजूने प्रभावी कायदे करण्यात आले असताना अद्यापही ते कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.तेथील विवाहित महिला प्राजक्ता जाधव हिचे लग्न दि.२७ सप्टेंबर २०१९ रोजी झाले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळींनी आपले खरे स्वरूप दाखविण्यास प्रारंभ केला व तिला दि.१७ मार्च २०२३ पर्यन्त त्रास दिला असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,”आपल्या पतीच्या घरी त्यांना त्यांना घर बांधायचे असून त्या साठी नवरा अतुल उत्तम जाधव,सासू मंदा उत्तम जाधव,नणंद अश्विनी ज्ञानेश्वर बलकवडे,भाया राहुल उत्तम जाधव सर्व रा.लोहगाव,पुणे आदींनी घर बांधण्यासाठी माहेराहून ०१ लाख रुपये आणावे यासाठी तिचा गत चार वर्षापासून शारीरिक,मानसिक छळ करून,उपाशी पोटी ठेवून तिला शिवीगाळ,दमदाटी करून मारहाण केली आहे या शिवाय तिच्या बाळंतपणाच्या वेळी तिच्या आई वडिलांनी तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने तिला अपंग मुलगा जन्मला आहे असा आरोप करून तिला उपाशी पोटी ठेऊन तिला त्रास दिला आहे.या प्रकरणी महिला प्राजक्ता अतुल जाधव (वय-२८) त्यामुळे कोळपेवाडी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.घनास्थळी पोलीस निरीक्षक देसले व पो.ना.कोकाटे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.१३९/२०२३ भा.द.वि.कलम ४९८,(अ)३२३,५०४,५०६,३४ अन्वये नुकताच गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ना.व्ही.एन.कोकाटे हे अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close