जाहिरात-9423439946
खेळजगत

एकलव्य निवासी शाळेचे खेळाडू यशस्वी होणार-चैताली काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

आदिवासी विभागाअंर्तगत चालविल्या जाणाऱ्या सी.बी.एस.ई. बोर्ड अंर्तगत केंद्र शासनाच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या एकलव्य प्रेरणादायी निवासी शाळेमधील विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या राष्ट्रिय क्रिडा स्पर्धेचे आयेाजन भोपाळ येथे होणार असून या शाळेचे विद्यार्थी नक्कीच यश मिळवतील असा आशावाद जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी नुकताच एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.


आदिवासी विभागाच्या मुलांना आधुनिकतेचे क्रिडा प्रषिक्षण देवुन येणाऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नाव देशात उंचावण्यासाठी आत्मा मालिक क्रिडा संकुल प्रयत्नशिल आहे. सर्व सुविधांनी परिपुर्ण प्रशिक्षण राज्यातील या खेळाडुंना दिले जाणार आहे. त्यासाठी खेळाडुंना आवश्यक ते क्रिडा मैदाने, निवास, भोजन आदी सुविधांसह तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा स्पर्धेची तयारी करून घेतली जाणार आहे-नंदकुमार सूर्यवंशी.

राज्याचे प्रतिनिधत्व करणाऱ्या 16 क्रिडा प्रकारातील खेळाडूंना राष्ट्रिय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापुर्वी क्रिडा प्रशिक्षणाची जबाबदारी आत्मा मालिक क्रिडा संकुलाकडे नुकतीच देण्यात आली आहे. त्या स्पर्धेच्या पुर्व तयारीच्या क्रिडा प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ चैताली काळे यांच्या हस्ते गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर संपन्न झाला त्या वेळी त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, विश्वस्त प्रकाश भट, गौतम स्कुलचे प्राचार्य नुर शेख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, गौतम पब्लीक स्कुलचे क्रिडांगण हाॅकी खेळासाठी प्रसिध्द आहे. याच मैदानावर खेळुन राज्य व देश पातळीवर खेळाडुंनी आपले नाव उंचावले आहे. या मैदानावर हाॅकी व फुटबाॅल क्रिडा प्रकाराचे अनेक राष्ट्रीय खेळाडू तयार झालेले आहेत. या शिबीरामध्ये सहभागी होणाऱ्या आदिवासी विभागाच्या एकलव्य निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांची तयारी ही राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडू सुवर्ण पदक मिळवतील अशीच करून घेतली जाईल. याठिकाणी खेळलेल्या खेळाडूंना येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्की यश मिळेल असा आशावाद व्यक्त करून खेळाडूंना आवश्यक ती मदत संकुलाच्या माध्यमातुन केली जाईल असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.
यावेळी बोलताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हणाले की, आदिवासी विभागाच्या मुलांना आधुनिकतेचे क्रिडा प्रषिक्षण देवुन येणाऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नाव देशात उंचावण्यासाठी आत्मा मालिक क्रिडा संकुल प्रयत्नशिल आहे. सर्व सुविधांनी परिपुर्ण प्रशिक्षण राज्यातील या खेळाडुंना दिले जाणार आहे. त्यासाठी खेळाडुंना आवश्यक ते क्रिडा मैदाने, निवास, भोजन आदी सुविधांसह तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा स्पर्धेची तयारी करून घेतली जाणार आहे असेही ते शेवटी म्हणाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close