जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

नगर-मनमाड मार्गावर पुन्हा खड्यांचा महापूर,कामाची चौकशी करा -प्रवाशांची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

सावळीविहिर (प्रतिनिधी )

उत्तर व दक्षिण भारताला जोडण्यात अहंम भूमिका निभावणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवून फक्त आठ-दहा दिवस झाले नाही तोच मागे परत हे खड्डे पडायला सुरुवात झाली झाल्याने प्रवाशांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली असून यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असाही मागणी केली आहे.

नुकत्याच संपलेल्या परतीच्या पावसाने नगर-मनमाड महामार्गावर सावळविहीर फाटा ते शिर्डी दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते अनेक अवजड वाहनांचे यांचे टायर फुटणे,मोटारसायकली घसरून पडणे, आदी प्रकार सर्रास होत होते अनेकजण त्यामुळे जखमी झाले होते अनेकांचे वित्तीय नुकसान झाले होते. वाहनधारकांना या रस्त्याने जाताना येताना येथे मोठी कसरतच करावी लागत होती.या रस्त्याला खड्डे आहेत की खड्ड्यात हा रस्ता आहे हे समजायला मार्ग नव्हता. त्यामुळे नगर-मनमाड रस्त्यावर वर सावळीवीहिर ते शिर्डी दरम्यान पडलेले मोठे खड्डे बुजवण्याची वाहनधारकांची मागणी होती त्याप्रमाणे हे खड्डे आठ-दहा दिवसांपूर्वी बुजावण्यास सुरुवात झाली व झटपट ते बुजवण्यात आले परंतु झटपट व निकृष्ट पणे काम व त्यात पाऊस यामुळे या खड्ड्यातील खडी लगेच निघण्यास सुरुवात झाली आहे व परत खड्डे पडताहेत खर्च झाला वेळगेला तरी खड्डे परत पडायला सुरुवात झाली असल्याने वाहनधारक व नागरिकांमधून नाराजी निर्माण होत आहे यापुढे तरी रस्त्यावर खडडे बुजवताना उत्कृष्टपणे काम व पावसाचा विचार करून कोरड्या वेळेत केले तरच ते टिकतील असे बोलले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close