कोपरगाव तालुका
विस्थापितांना दुकाने देण्यासाठी कोपरगाव पालिकेने ठराव मंजूर केला-विजय वहाडणे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव( प्रतिनिधी )
कोपरगाव नगरपरिषदेने धारणगाव रोडलगत चोपन्न खोकाशॉप उभारण्यासाठी दोन वेळा निविदा प्रसिद्ध मात्र त्या भरण्यासाठी कोणीही पुढे नाल्याने व त्याबाबत न्यायालयात तक्रारी झाल्याने तो विषय अडगळीत पडला असला तरी त्यानंतर आपण कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विस्थापित व व्यावसायिकांना खोकाशॉपसाठी करारपत्र करून जागा उपलब्ध करून देण्यासाठी ठराव मंजूर करून घेतला असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
कोपरगाव बस स्थानकाचे भूमिपूजन करून श्रेय घेण्याची घाई झालेल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींना एवढे दिवस विस्थापितांची आठवण का आली नाही असा सवाल विचारला असून व्यवस्थित नियोजन करून बांधकाम केले असते तर नवीन बसस्थानक इमारतीभोवती किमान दोनशे गाळे बांधता आले असते. त्यासाठी त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या संगमनेर बसस्थानकाचे उदाहरण दिले आहे.तेथे गाळे बांधल्याने अनेक व्यावसायीकांची सोय झाली आहे. निवडणुक पार पडल्यानंतर परिवहन मंत्र्यांना भेटून कोपरगाव बस स्थानकाभोवती गाळे उभारण्यासाठी विस्थापिताना सोबत घेऊन आपण प्रयत्न करणार आहोत.
कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीत 10 मार्च 2011 रोजी अतिक्रमाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करून सुमारे दोन हजार शंभरहून अधिक अतिक्रमणे उध्वस्त केली होती.त्यानंतर आलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हा विषय मोठ्या प्रमाणात गाजला होता.व त्यावेळी एका माजी मंत्र्यांनी बस स्थानक परिसरात ,धारणगाव रास्ता परिसरात रांगोळ्या काढून मतांसाठी ढोंगबाजी केली होती.व आपली विधानसभा साजरी करून घेतली होती त्यानंतर अनेकवेळा नगरपरिषद त्याच सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असताना अद्यापही विस्थापितांना न्याय भेटलेला नाही.या पार्श्वभूमीवर कोपरगावात विस्थापित नागरिक व व्यापारी यांनी खुल्या नाट्यगृहात नुकतीच बैठक घेऊन या बाबत आवाज उठवला होता.व ज्यांनी विस्थापितांची फसवणूक केली त्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतल्याने कोपरगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे कि,कोपरगाव बस स्थानकाचे भूमिपूजन करून श्रेय घेण्याची घाई झालेल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींना एवढे दिवस विस्थापितांची आठवण का आली नाही असा सवाल विचारला असून व्यवस्थित नियोजन करून बांधकाम केले असते तर नवीन बसस्थानक इमारतीभोवती किमान दोनशे गाळे बांधता आले असते. त्यासाठी त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या संगमनेर बसस्थानकाचे उदाहरण दिले आहे.तेथे गाळे बांधल्याने अनेक व्यावसायीकांची सोय झाली आहे. निवडणुक पार पडल्यानंतर परिवहन मंत्र्यांना भेटून कोपरगाव बस स्थानकाभोवती गाळे उभारण्यासाठी विस्थापिताना सोबत घेऊन आपण प्रयत्न करणार आहोत. अनेक वर्षे विस्थापितांसाठी काहीच न करणारे नेते मात्र माझ्या नांवाने दुर्दैवाने गळा काढताहेत. विस्थापितांसाठी काहीच न करता केवळ मतांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना वठणीवर आणणे गरजेचे असल्याची फोडणी नगराध्यक्ष वाहाडणे यांनी नेमक्या वेळी दिल्याचे मानले जात आहे.