जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

कोपरगावात जिस का डर था.. वही हो गया !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना विषाणूने जगात खळबळ उडवून दिली असताना अद्याप मात्र कोपरगाव शहर व तालुका मात्र त्याला अपवाद होता मात्र आज आलेल्या एका बातमीनुसार कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर या उपनगरात रहिवाशी असलेल्या एका साठ वर्षीय महिलेला कोरोना विषाणू असल्याचा सकारात्मक अहवाल टाळेबंदीच्या सतराव्या दिवशी आला असल्याची विश्वसनिय माहिती हाती आल्याने व त्याला आधिकारीक पातळीवर दुजोरा मिळाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.आता जिल्ह्यात लागण झालेल्या रुग्णांची संख्या २७ झाली आहे.

कोपरगाव शहर व तालुका त्याला अद्यापपर्यंत अपवाद होता.मात्र कोपरगाव येथील आरोग्य विभागाने कोपरगावात रहिवाशी असलेल्या एका साठ वर्षीय महिलेला काही प्राथमिक लक्षणांवरून तिचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी पुण्याला पाठवला होता तो आज सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.या बाबत अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही मात्र या बाबत कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला असून बातमी शतप्रतिशत खरी असल्याचे सांगून त्या बाबत कोपरगाव तहसील कार्यालयात तातडीची बैठक चालू असल्याचे सांगितले आहे.

तहसील कार्यालयातील बैठकी नंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळापासून दोन की.मी.अंतराचा परिसर सील करण्याची तातडीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.त्यात संपूर्ण कोपरगाव येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६ हजार ८२५ इतकी झाली असून २२९ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर १६२ ने वाढ होऊन ती संख्या १ हजार ३६४ वर पोहचली आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव शहर व तालुका त्याला अद्यापपर्यंत अपवाद होता.मात्र कोपरगाव येथील आरोग्य विभागाने कोपरगावात रहिवाशी असलेल्या एका साठ वर्षीय महिलेला काही प्राथमिक लक्षणांवरून तिचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी पाठवला होता तो आज सकारात्मक (पॉझिटिव्ह) आल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान सदर महिला ही अविवाहित असून आपल्या भाच्याकडे राहत असून घरात सहा सदस्य राहतात.त्यातील चार भाचे असून बहुतेक सोनारकीचा व्यवसाय करत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या महिलेचा कुठे बाहेर गेल्याचा इतिहास नाही हे विशेष! तिला प्राथमिक सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करून पुढील तपासणीसाठी स्राव पुण्याला लष्करी रुग्णालयात पाठविण्यात आला होता.त्याचा अहवाल आज प्राप्त झाल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे.

दरम्यान अधिकाऱ्यांनी कोपरगाव तहसीलदार योगेश चन्द्रे यांचे कार्यालयात तातडीची बैठक घेतली असून त्यात कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर,डॉ.श्री.एकबोटे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या बाबत अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी उचलला नाही मात्र या बाबत कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यास दुजोरा दिला असून बातमी शत प्रतिशत खरी असल्याचे सांगून त्या बाबत कपरगाव तहसील कार्यालयात तातडीची बैठक चालू असल्याचे सांगितले आहे.त्या मुळे संपूर्ण प्रशासन तणावात आले आहे.व तातडीच्या उपाय योजनांच्या कामात त्यांनी झोकून दिले आहे.नागरिकांवर त्यामुळे सामाजिक अंतराचे पालन करण्याचे दायित्व वाढले आहे.ज्या गोष्टीचे भीती होती नेमके तेच झाल्याने आता नागरिकांवर व अधिकाऱ्यांवर मोठी जोखीम वाढली आहे.व सर्वच जण आता तणावात आले आहे.आमच्या प्रतिनिधीने वारंवार याबाबत नागरिकांना सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close