नगर जिल्हा
जिल्हा पोलिसांनी कोपरगावातील एका कुख्यात आरोपीसह तिघांना केले वर्षासाठी स्थानबद्ध !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
नगर जिल्ह्यात आगामी काळात होणारे गणेशोत्सव व मोहरम हे हिंदू व मुस्लिम बांधवांचे सण उत्सव येत असल्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या साठी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी जिल्ह्यातील कोपरगाव गांधीनगर येथील अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील (वय-20) महेंद्र बाजीराव महारनोर वय-26) रा. डोमळवाडी ,वांगदरी ता.श्रीगोंदा तसेच सुदाम उर्फ दीपक भास्कर खामकर (वय-28) ता. पारनेर तीन धोकादायक गुन्हेगारांना एम.पी.डी.ए.कायद्याअंतर्गत सहा सप्टेंबर पासून एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी दिले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी नगर जिल्ह्यातील वाळूतस्कर,अवैध व्यवसाय करणारे दप्तरावरील धोकादायक व्यक्ती यांच्या विरुद्ध विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन-1980 च्या कलमान्वये कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते.त्या साठी नगर जिल्ह्यातून कोपरगाव,श्रीगोंदा व पारनेर पोलीस ठाण्याकडून अशा धोकादायक तीन गुन्हेगारांचे अहवाल स्थानिक पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाले होते.

या पोलिसांच्या अहवालावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निर्णय घेऊन वरील तीन गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते.त्या प्रमाणे या तिन्ही आरोपींना त्या त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आज रोजी ताब्यात घेऊन नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना केले आहे. हि कारवाई नगर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील,श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे,शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी पोलीस निरीक्षक दौलत जाधव,अंबादास भुसारे, कोपरगावचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
कोपरगाव येथील आरोपी अजय गणेश पाटील या आरोपी विरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2017 पासून सन 2019 पर्यंत पाच गुन्हे नोंदविण्यात आले आहे.तर वाळू तस्कर सुदाम खामकर याचे विरुद्ध सन 2016 ते 2019 पर्यंत जबरी चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.तर महेंद्र महारनोर विरुद्ध सन 2015 पासून 2019 पर्यंत नऊ जबरी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्ह्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.