कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात विधानसभा उमेदवारांच्या प्रचाराला आला वेग !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव(प्रतिनिधी)
राज्याची विधानसभा निवडणूक अवघी काही दिवसावर येऊन ठेपली असताना राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे, कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यात अद्याप कोण कोणत्या पक्षात आहे हे समजून यायला तयार नाही. आज धडाने जरी काही नेते विशिष्ट पक्षात दिसत असले तरी उद्या ते नेमक्या कोणत्या पक्षात असतील याचा त्यांनाही थांगपत्ता असण्याची सुतराम शक्यता दिसत नाही विशेष इच्छुक जवळपास सर्वच उमेदवार भाजपच्या उमेद्वारीकडे डोळे लावून बसले आहेत.तालुक्यातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हे उमेदवार वर्तमानात दहाव्या तेराव्यांच्या कावळ्यासारखे जमताना दिसत आहेत.तालुक्यातील गावागावातील चौका-चौकात आपल्या छबी असलेले फलक वारेमाप दिसत आहेत.एरवी एखाद्या कार्यकर्त्याने उभे आयुष्य यांच्यासाठी टाचा घासल्यानंतर त्याने इहलोकोची यात्रा संपवल्यावर त्याच्या दशक्रियाचा फलक लावण्याची या नेत्यांची औकात नसते पण स्वतःला निवडणुकीचे बाशिंग बांधायचे म्हटल्यावर याना पैसा-अडक्याची मुळीच वानवा नसते.आगामी निवडणूका पाहून काहींच्या हातात माणुसकीची ज्योत आली असून त्यांचा माणुसकीचा गहिवर अनावर झाला आहे.तर
एरवी एखाद्या कार्यकर्त्याने उभे आयुष्य ज्या नेत्यांसाठी टाचा घासल्या त्याने इहलोकोची यात्रा संपवल्यावर त्याच्या दशक्रियाचा फलक लावण्याची या नेत्यांची औकात नसते पण स्वतःला निवडणुकीचे बाशिंग बांधायचे म्हटल्यावर याना पैसा-अडक्याची मुळीच वानवा नसते.
काहींना आपल्या राज्यात मतदारांना अद्याप रेशन मिळत नव्हते याचा साक्षात्कार होऊन त्यांच्या शिधापाण्याची आठवण येऊन मंत्री पातळीवरील व जिल्हा पातळीवर नेतृत्व करणारे नेते घरोघरी जाऊन त्यांची विचारपूस करण्याचा उमाळा आला आहे, कोणाला जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालये थाटावी असे वाटले आहे.तर काहींना ज्या अण्णांच्या पोटी जन्माला येऊनही अण्णा समजले नाही ते आता आपली पोळी भाजण्यासाठी ज्यांनी अण्णांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी 1999 नंतर पायदळी तुडवले त्यांच्या साहाय्याने अण्णांचे स्वप्न पूर्ण करायला निघाले आहेत.तर काही नेते लाखो रुपयांचे बक्षिसे जाहीर करून स्वतःला जितेपणीच इतिहासपुरुष ठरविण्यासाठी स्वतःचे सवाल जबाब विचारून लोकांची दिवाळी आधी दिवाळी करण्यास आतुर झाले आहेत.तर काहींना मतदारांनी नगरपरिषदेत सत्ता देऊनही त्यांचा अधिकचा हव्यास निर्माण होऊन विधानसभेची स्वप्ने दिवसां तरळण्यास लागली आहे. त्यामुळे आगामी काळात मतदारांनी आता सर्वांनाच पारखून घेण्याची वेळ आली आहे.सध्या राजकारणात स्वार्थ आणि हवा कोठे वाहते याला अधिक महत्व आले आहे.
प्रत्येक निवडणुकीत नेत्याना घोडे खाजवणारे,कोणी रथ हाकणारे, नालमेख मारणारे,तंगतोबरा करणारे,कोणी हिशेब लिहिणारे,कोणी कारकून,कोणी पोवाडे गाणारे,कोणी कपडे नेसवणारे,कोणी शिजविणारे,कोणी पोरांना दूध पाजणारे ,पंक्ती बारगिर, विशेष म्हणजे सर्व करून झाल्यावर खाणारी तोंडे हवी असणार आहे,यासाठीच तर हि लोकशाही आहे.
तर कार्यकर्त्यांची अवस्था,” मोले घातले रडाया,न आसू न माया”अशी झाली आहे.हे सर्व खरे असले तरी कार्यकर्त्यांना आपल्या या नेत्यांसाठी तयार राहवेच लागणार आहे.कारण नेत्याना घोडे खाजवणारे,कोणी रथ हाकनारे, नालमेख मारणारे,तंगतोबरा करणारे,कोणी हिशेब लिहिणारे,कोणी कारकून,कोणी पोवाडे गाणारे,कोणी कपडे नेसवणारे,कोणी शिजविणारे,कोणी पोरांना दूध पाजणारे ,पंक्ती बारगिर, विशेष म्हणजे सर्व करून झाल्यावर खाणारी तोंडे हवी असणार आहे,यासाठीच तर हि लोकशाही आहे.त्यामुळे सर्वांनी तयार राहायला हवे आहे.कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता केवळ निवडणुका जिंकणे या आपल्याकडच्या राजकीय संस्कृतीला आज तरी आपल्यापुढे अन्य पर्याय दिसत नाही.