जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

मला निलंबित करण्याचा अधिकार जिल्हा भाजपाला कोणी दिला-वहाडणेंचा सवाल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

जिल्ह्यातील काही वर्तमानपत्रात पत्रांत आपले निलंबन मागे घेण्यासाठी जिल्हा भाजपच्यावतीने प्रदेश कार्यकारिणीला प्रस्ताव गेला असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.मात्र मला निलंबित नेमके कोणी केले व त्याचा जिल्हा भाजपशी काय संबंध असा उलटा सवाल कोपरगाव नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे.
त्यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे कि,आपल्याला आजपर्यंत कधीही पक्षातून निलंबित केल्याचे पत्र मिळालेले नाही.मला निलंबित करण्याचा अधिकार जिल्हा भाजपाला दिला कुणी ? प्रदेश भाजपाचे नेते सांगतात,तुमच्या निलंबनाशी प्रदेश भाजपाचा काहीच संबंध नाही.मला पक्षातून निलंबित केलेले आहे असे म्हणणाऱ्याना मी जाहिरपणे विचारतो कि, मला जर पक्षातून निलंबित केलेले होते,मग असे असतांना प्रदेश भाजपाच्या “मनोगत” या मासिकात मी नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर भाजपाच्या यादीत माझे नांव का छापले? सर्वप्रकारच्या पक्षविरोधी कारवाया करणारे,दलाली करणारे अनेकजण जिल्हा पक्ष संघटनेत पदाधिकारी आहेत.जिल्हा भाजपातील गटबाजीशी माझा काहीच संबंध नसतांना एका टोळीने माझ्याविरुद्ध कट केला व कोपरगावच्या लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली (आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता )माझे निलंबन केल्याची आवई उठवून मला पक्ष संघटनेपासून दुर ठेवले.
कोपरगाव तालुक्यात भाजपाच्या पक्ष संघटनेची वाट लावून स्वतःची टोळी मोठी करणाऱ्या नेत्यांनाच पक्षाने उमेदवारी दिल्यास पक्षाला मतदार धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाहीत असा इशारा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या चांगल्या प्रतिमेमुळे यश मिळेल या भ्रमात जिल्हा भाजपाने राहू नये.कोपरगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन झाल्याशिवाय रहाणार नाही.कारण या मतदारसंघात पक्षाने प्रस्थापित सहकार सम्राटांना उमेदवारी दिल्यास मतदार परिवर्तन घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.कोपरगाव शहरातील जागरूक मतदारांनी प्रस्थापित श्रीमंत पुढारी व त्यांची दहशत पराभूत केली.त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीतही होणार आहे याचा मला ठाम विश्वास असल्याचेही शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close