जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

..या गावच्या रस्त्याचे काम सुरु,ग्रामस्थांत समाधान

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या रस्त्याच्या रखडलेल्या कामाला आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून चालना मिळाली असून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे धनगरवाडीचे उपसरपंच अनिल रक्टे यांनी दिली आहे.

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील रेल्वेच्या बोगद्यामुळे धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या रस्त्याचे काम रखडलेले होते. त्यामुळे या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता.या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी धनगरवाडीच्या नागरिकांनी आ.काळे यांच्याकडे मागणी केली होती.

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील रेल्वेच्या बोगद्यामुळे धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या रस्त्याचे काम रखडलेले होते. त्यामुळे या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता.या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी धनगरवाडीच्या नागरिकांनी आ.काळे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेवून त्यांनी मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता अमित चोळके यांच्या समवेत बैठक घेवून योग्य तोडगा काढून या रस्त्याचे काम मार्गी लावण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली होती. मुख्यमंत्री सडक योजनेचे अहमदनगरचे कार्यकारी अभियंता सानप,नासिकचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ यांचेशी आ.काळे यांनी संपर्क करून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे यासाठी पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्यातून धनगरवाडी फाटा ते रक्टे वस्ती या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण होणार असल्यामुळे धनगरवाडीच्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून धनगरवाडी ग्रामस्थांनी आ.काळे यांचे बाबत समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close