जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मूल गटारीत पडले,प्रशासनाची धावाधाव !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील सुभाषनगर परिसरात साधारण दीड वर्षांचे बालक गटारीत पडल्याची अफवा पसरल्याने कोपरगाव नगरपरिषद व संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या अग्नी बंबाची एकच धावाधाव झाली मात्र उशिराने सखोल माहिती घेतली असता ते मूल घरातच असल्याचे सिद्ध झाल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.हे मूल एक साबण वाल्याचे असल्याचे उघड झाले आहे.

एका नगरसेवकाच्या बंगल्यानजीक रहिवाशी असलेल्या व एक साबणाचा व्यापार करणाऱ्या गृहस्थाच्या घरातील एक दीड वर्षाचे बालक गायब झाल्याची अफवा उठली व त्याच्या शोधासाठी ओघानेच धावाधाव सुरु झाली शेजारी,पाजारी जवळच्या नातेवाईकडॆ सर्वत्र शोधून झाल्यावर हे बालक थेट गटारीतच वाहून गेल्याची चर्चा सुरु झाली व त्याचा जीव वाचविण्यासाठी एकच कल्लोळ उडाला.मग दादा,भाऊ,आप्पा आदींनी लगेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तर कोणी संजीवनी सहकारी कारखान्याच्या अग्नीशामक बंब आदींचा शोध करू लागले मात्र उशिरा मूल घरातच गाढ झोपेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील उपनगर असलेले सुभाषनगर येथे जेऊर पाटोदा ग्रामपंचायत हद्दीतून संभाजी महाराज चौक मार्गे एक मोठा नाला वाहत येतो तो सर्वाधिक मोठा असल्याने त्याला या सर्व परिसरातून मोठ्या प्रमाणावर या गटारितून नेहमी पाणी वाहत असते.विशेष म्हणजे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने या पाण्याची आणखी भर पडली होती.त्याच एका नगरसेवकाच्या बंगल्यानजीक रहिवाशी असलेल्या व एक साबणाचा व्यापार करणाऱ्या गृहस्थाच्या घरातील एक दीड वर्षाचे बालक गायब झाल्याची अफवा उठली व त्याच्या शोधासाठी ओघानेच धावाधाव सुरु झाली शेजारी,पाजारी जवळच्या नातेवाईकडॆ सर्वत्र शोधून झाल्यावर हे बालक थेट गटारीतच वाहून गेल्याची चर्चा सुरु झाली व त्याचा जीव वाचविण्यासाठी एकच कल्लोळ उडाला.मग दादा,भाऊ,आप्पा आदींनी लगेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तर कोणी संजीवनी सहकारी कारखान्याच्या अग्नीशामक बंब मागविण्यासाठी त्यांच्या स्वियसहायकाची मदत घेतली तर कोपरगाव मुख्याधिकारी यांना फोन करण्यासाठी प्रयत्न करू लागले अखेर तेही करून झाले आणि शेवटी गटारीत मूल शोधण्यासाठी सुरुवात करणार तो एका महिलेच्या हि बाब लक्षात आली व तिने घरात सहज लक्ष टाकले असता ते बाळ मागच्या खोलीत गाढ झोपले असल्याचे लक्षात आल्यावर तिने हि शोधाशोध करून गावाला वळसा घालणाऱ्या मंडळींना हि आनंद वार्ता सांगितली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे.दरम्यान संजीवनी अकरखान्याच्या या अग्नी शामक बंबाला मात्र उगीच धावाधाव करत यावे लागले हि बाब अलाहिदा ! दरम्यान हि वार्ता सर्व सुभाषनगर उपनगरात पसरल्याने घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती.हे वेगळे सांगायला नको !

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close