जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विहिरीत पडून महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी कु.अक्षदा संजय धेनक (वय-१७) नुकतीच वस्तीजवळील विहिरीत पडून निधन झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी अकस्मात मुत्युची नोंद केली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दि.२७ ऑगष्ट रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सदर मुलगी पाणी आणण्यासाठी वस्तीजवळील विहिरीवर गेली होती.सदर विहिरिच्या आजूबाजूस निसरडी जागा व चिखल असल्याने तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडल्याचे बोलले जात आहे.तिचा आवाज ऐकून तिची बहीण तिला वाचविण्यास पळत आली होती.तिचाही तोल जाऊन तीही पहिलीला वाचविण्याच्या प्रयत्नात पडली त्यामुळे दोन्हीचे जीवित धोक्यात आले होते.मात्र आजीने प्रसंगावधान राखून त्यातील एकीला दोर सोडून वाचविण्यात यश मिळवले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण पंचवीस कि.मी.अंतरावर चासनळी ग्रामपंचायत असून या ठिकाणी मयत मुलीचे धेनक कुटुंब व ती आपल्या आजी,आजोबा,आई,वडील,तीन बहिणीसह रहात होती.ती गावातच कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीत शिक्षण घेत होती.

शनिवार दि.२७ ऑगष्ट रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सदर मुलगी पाणी आणण्यासाठी वस्तीजवळील विहिरीवर गेली होती.सदर विहिरिच्या आजूबाजूस निसरडी जागा व चिखल असल्याने तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडल्याचे बोलले जात आहे.तिचा आवाज ऐकून तिची बहीण तिला वाचविण्यास पळत आली होती.तिचाही तोल जाऊन तीही पहिलीला वाचविण्याच्या प्रयत्नात पडली त्यामुळे दोन्हीचे जीवित धोक्यात आले होते.मात्र आजीने प्रसंगावधान राखून त्यातील एकीला दोर सोडून वाचविण्यात यश मिळवले होते.तर पहिली बुडाली होती.तिला वाचविण्यास उशीर झाल्याने ती त्याच विहिरीत गतप्राण झाली आहे.तिला वर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले आहे.उत्तरीय तपासणी नंतर तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेबाबत प्रकाश एकनाथ शिंदे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,पो.हे.कॉ.एस.डी.बोटे यांनी भेट दिली आहे.तिच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.५६/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्सनखाली पो.हे.कॉ.बोटे हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close