जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

साई प्रसादालयात साई भक्तांना…हा विशेष प्रसाद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिरूर येथील साईभक्‍त शेतकरी रवि नारायण करगळ यांनी साधारणतः ०२ लाख ०२ हजार किमंतीचे २ हजार ५२७ किलो ग्रॅम केशर आंबे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या प्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

साईभक्‍त शेतकरी रवि नारायण करगळ यांनी साधारणतः ०२ लाख ०२ हजार किमंतीचे २ हजार ५२७ किलो ग्रॅम केशर आंबे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या प्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले असून त्याचा प्रसादलयात प्रसाद दिला आहे.त्यावेळी पाहणी करताना प्र.कार्यकारी अधिकारी राहुल जाधव दिसत आहे.

सदर साई भक्त चार ते पाच वर्षापासून सेंद्रीय पध्‍दतीने पिकविलेले आंबे देणगी स्‍वरूपात संस्थान प्रसादालयासाठी देत आहेत. मागील वर्षीही श्री करगळ यांनी सुमारे ०४ लाख २५ हजार रुपये किंमती ०५ हजार किलो केशर आंबे देणगी स्‍वरूपात दिले होते त्याचा एक लाखाहूनअधिक साईभक्तांनी लाभ घेतला होता.देणगी स्वरुपात प्राप्त झालेले केसर आंबे रासायनिक प्रक्रिया न करता,नैसर्गिकरित्‍या पिकविलेले व उच्‍च प्रतीचे आहेत.

आजपासून संस्‍थानच्‍या साई प्रसादालयात संस्‍थान कर्मचा-यांचे श्रमपरिहारासाठी व साईभक्‍तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्‍यांच्‍या रसाचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगून सर्वांनी या प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close