जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राष्ट्रवादीचे आ.जयंत पाटील यांच्यामागे खंबीर उभे-…या नेत्याचा दावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना ईडी कार्यालयाकडून नोटीस पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली.केंद्राच्या व राज्याच्या अखत्यारीत असलेल्या ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे.अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

“केंद्राच्या व राज्याच्या अखत्यारीत असलेल्या ईडी सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा होत असेलेला प्रयत्न राजकीय प्रेरित आहे.प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना चौकशीसाठी पाचारण करून त्यांची बदनामी केली जात आहे.यातून काहीही साध्य होणार नाही”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांची आय.एल.अँड एफ.एस.अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस संबंधित कथित गैरव्यवहाराशी कोणताही संबंध नसतांना त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ईडीकडून नोटीस पाठवून सोमवार त्यांची चौकशी करण्यात आली.त्या निषेधार्थ आ. काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथे निषेध आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.

सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शहर युवक अध्यक्ष नवाज कुरेशी,कारभारी आगवन,कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, संचालक सुधाकर रोहम,डॉ.मच्छिंद्र बर्डे,गंगाधर औताडे,शंकरराव चव्हाण,महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,संचालक राजेंद्र निकोले,रामदास केकाण,गौतम बँकेचे संचालक रायभान रोहम,प.स.माजी उपभापती अर्जुन काळे,माजी सदस्य मधुकर टेके,पद्मविभूषण शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मुकुंद इंगळे,राजेंद्र आभाळे,रमेश गवळी,फकीर कुरेशी,अजीज शेख,दिनकर खरे,राजेंद्र खिलारी, प्रशांत वाबळे,डॉ.आतिश काळे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले,”केंद्राच्या व राज्याच्या अखत्यारीत असलेल्या ईडी सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणून विरोधकांचा आवाज दाबण्याचा होत असेलेला प्रयत्न राजकीय प्रेरित आहे.प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना चौकशीसाठी पाचारण करून त्यांची बदनामी केली जात आहे.यातून काहीही साध्य होणार नसून हा दबाव तंत्राचा वापर आहे.या घटनेचा जाहीर निषेध करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रभारी तहसीलदार विकास गंबरे यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close