दळणवळण
…या गावातील नागरिकांचा रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी-.. या नेत्याचा दावा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सडे येथील रस्त्याला निधी देवून या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी २० लक्ष रुपये निधी दिला होता.त्यासाठी सडे ग्रामस्थानीं समाधान यक्त केले आहे.
आ.काळे यांनी या परिसरातील वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांसाठी आजपर्यंत ९० लाखांचा निधी देवून अनेक रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्याचबरोबर सडे पाणी पुरवठा योजनेसाठी ३१ लाख रुपये व अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या सडे-शिंगवे रस्त्याला ३ कोटी निधी देवून सडे-शिंगवेच्या ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न कायमचा सोडविला असल्याचा दावा केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे.त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सडे त्याला अपवाद नाही या गावातही रस्ते फारच खड्डेमय झाले होते.त्यासाठी आ.काळे यांनी लक्ष देऊन २० लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे.सदर रस्ता हा सुर्यभान बारहाते घर ते मोहन देठे वस्ती रस्ता व दिगंबर लोहकणे शेड ते भास्कर बारहाते वस्ती असा असून या रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन व ७ लक्ष रुपये निधीतून देण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण नुकतेच आ.काळे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,सरपंच आशाबाई बारहाते,गणेश बारहाते,उपसरपंच अनिल बारहाते,रावसाहेब बारहाते,संतोष बारहाते,नितीन बारहाते,सुदाम बारहाते,रमेश वाकचौरे,विजय बारहाते,माणिक बारहाते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर प्रसंगी आ. काळे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करून सूचना केल्या असल्याची माहिती हाती आली आहे.