जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

खंदक नाला पुरात सायकल मार्टचे दहा लाखांचे नुकसान !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव येथील जुन्या नगर पालिकेजवळ असलेल्या जय हिंद सायकल मार्टचे गोदाम असलेल्या गोकुळनगरी येथील गोदामात नुकत्याच आलेल्या खंदकनाला पुराचे पाणी घुसून संचालक शंकरराव आव्हाड यांच्या विविध महागड्या सायकली टायर व विविध साहित्य असे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे अनेकांनीं हळहळ व्यक्त केली आहे.

“पुराच्या या झालेल्या नुकसानीत साधारण ३ ते ५ हजारांच्या नव्या सायकली,सायकल टायर,१६-१५ हजार रुपये किमतीच्या तरुणांच्या आवडीच्या महागड्या सायकली,गिअर सायकली,आरशे,डिक्स ब्रेक,किड्स सायकली आदींचा समावेश आहे”-शंकरराव आव्हाड,संचालक,जय हिंद सायकल मार्ट.

कोपरगाव तालुक्यात दि.२० ऑक्टोबर रोजी पहाटे एकच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने कोपरगाव शहर परिसरासह तालुक्याला झोडपून काढले असून खडकी उपनगरातील लोकवस्तीत पाणीच पाणी झाले असून खंदक नाला परिसरातील कर्मवीरनगर,द्वारका नगरी,बैल बाजार रोड,स्टेशन रोड,गोकुळनगरी आदी सह तालुक्यातील कृषी क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.कोपरगाव शहरात तर सर्व उपनगरे आणि परिसरात असलेल्या नागरी वस्तीत पाणीच पाणी झाले असून सुदैवाने तुरळक जीवित हानी झाली आहे. हि बाब उघड झाली आहे.

सदर ठिकाणी आमच्या प्रतिनिधीने समक्ष भेट दिली असता यातील नुकसानीचे चित्र समोर आले आहे.सदर प्रसंगी प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.रामदास आव्हाड,शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

इंदिरा पथ रस्त्याच्या नजीक असललेल्या गोकुळनगरी परिसरात पूर्व बाजूस असलेल्या अवैध पुलामुळे तेथे पूर पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन यात नुकसान झाल्याचे मानले जात आहे.या गोकुळनगरी व्यापारी संकुलात शंकरराव आव्हाड यांनी दोन गाळे गोदाम म्हणून वापरात ठेवले आहे.त्यात खच्चून सायकली आणि त्यांचे सुटे भाग,टायर आदी साहित्य ठेवले होते.मात्र दि.२० ऑक्टोबरच्या मध्यरात्री नंतर पावसाने कहर केला असून शहर आणि परिसरात सुमारे १०५ मि.मी.हुन जास्त पाऊस झाला आहे.त्यामुळे खडकी उपनगर आणि खालील बाजूस असलेली उपनगरे हि पाण्यात बुडाली आहे.त्यात सर्वाधिक नुकसान गोकुळनगरी,बैलबाजार रोड वसाहत,खडकी,खंदकनाला स्टेशन रोड गॅरेज लाईन परिसरात झाले असल्याचे उघड झाले आहे.त्यात आज सकाळी ‘जय हिंद’ सायकल मार्टचे गोदाम उघडल्यावर हे नुकसान उघड झाले आहे.त्यात अद्याप पंचनामा झालेला नाही.

यात झालेल्या नुकसानीत साधारण ३ ते ५ हजारांच्या नव्या सायकली,सायकल टायर,१६-१५ हजार रुपये किमतीच्या तरुणांच्या आवडीच्या महागड्या सायकली,गिअर सायकली,आरशे,डिक्स ब्रेक,किड्स सायकली असल्याची माहिती जय हिंद सायकल मार्टचे संचालक शंकरराव आव्हाड यांनी दिली आहे.आता या नुकसानीं बाबत प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close