जाहिरात-9423439946
संपादकीय

कोपरगाव शहराला नगरबुडी पासून वाचविण्यासाठी…

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यात काल पहाटे एकच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने कोपरगाव शहर परिसरासह तालुक्याला झोडपून काढले असून खडकी उपनगरातील लोकवस्तीत पाणीच पाणी झाले असून खंदक नाला परिसरातील कर्मवीरनगर,बैल बाजार रोड,स्टेशन रोड परिसरात असलेल्या नागरी वस्तीत पाणीच पाणी झाले असून सुदैवाने तुरळक जीवित हानी झाली आहे.त्यामुळे खंदकनाला परिसरातील ‘अतिक्रमण प्रश्न’ ऐरणीवर आला आहे.त्याबाबत पालिकेने खंदक नाला परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला असला तरी तो उशिराने सुचलेला शहाणपणा ठरत आहे.त्यामुळे शहरात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

शहराचे उपनगर असेलेल्या कर्मवीर नगरात इंदिरापथ रस्त्यावर मोऱ्या टाकून पूल केल्याने नैसर्गिक जलप्रवाह अडवला गेला नाही मात्र त्याच शेजारी पूर्वेस असलेला अनाधिकृत नळ्या टाकून बांधलेला ‘पूल’ पूर वाढण्यास कारणीभूत ठरला आहे.हे अनेकांच्या लक्षात आले असेल.त्यामुळे नजीकची घरे पाण्याखाली गेली हे सांगण्यास कोण ज्योतिषाची गरज नाही.या नैसर्गिक प्रवाहावर अडचण निर्माण कराल तर तो तुमच्यावर अतिक्रमण करील हा ‘क्रियेस प्रतिक्रिया’ साधा नैसर्गिक नियम ध्यानात ठेवावा लागेल.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे काल मध्यरात्री एक वाजे नंतर पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे.सुमारेच चार-पाच तास कोसळल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे.एकूण पाऊस १०५ मी.मी.कोसळला असल्याची माहिती जेऊर कुंभारी येथील हवामान खात्याचे दिली आहे.काल सकाळचा सूर्योदय झाल्यावर त्याची भयावहता समोर आली आहे.त्यावर पालिका प्रशासन जागे झाले आहे.आता त्यांनी कालचे काल खंदक नाला परिसरात त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.व अतिक्रमित जागा मोकळी करण्यास प्रारंभ केला आहे.
सन-२००६ साली मोठ्या प्रमाणावर पूर आल्यावर सरकारने पूर रेषा आखून दिली होती.त्यानंतर त्या पूर रेषेत किती नागरिकांनी घरे बांधली आणि किती जणांनी नैसर्गिक स्र्रोत अडवले,किती जणांनी गायीचे म्हशीचे गोठे बांधले,किती जणांनी गॅरेज,धार्मिक ठिकाणे स्थापन केली आहे,किती झोपड्या बांधल्या आहेत याची चाचपणी केली असती तर बऱ्याच अंशी हानी टाळली असती.पाऊस दिवसेंदिवस बेभरवशाचा होत चालला आहे.’जागतिक तापमान वाढ’ हा जागतिक चिंतेचा विषय ठरला आहे.

खंदक नाला हा उत्तरेकडून येऊन तो पूर्वेकडे वळतो पूर्वी तो पन्नास ते साठ फूट रुंदीचा होता.मात्र अनेकांनी आपल्या व्यवसाय आणि घराची भूक भगविण्यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे.त्यामुळे तोच नाला आता केवळ दहा-पंधरा उरला आहे.त्यामुळे नैसर्गिक स्र्रोत अडवला जात आहे.परिणाम समोर आहेच,गॅरेज लाईन,खडकी उपनगर,कर्मवीरनगर,द्वारकानगरी,बैलबाजार रोड वस्ती,संजय नगरचा उत्तर भाग आदी ठिकाणे अख्खी पाण्यात गेली होती.शिर्डीत हेच झाले होते.

जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल असं काही नसतं.असे मानणारे काही जण आहेत.पण ती गोष्ट आहे याचे पुरावे वैज्ञानिकांनी दिले आहेत.गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीचं सरासरी तापमान ०.८ डिग्रीनं वाढलं आहे आणि यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या तीन दशकातच ०.६ डिग्रीनं तापमान वाढलं आहे.त्याचा परिणाम वातावरणावर होत आहे.परिणामी सृष्टी चक्र बिघडले आहे.त्यामुळे पाऊस बेभरवशाचा झाला आहे.१९५६ नंतर एवढा पाऊस झाल्याचे अनेकांचे निरीक्षण आहे.६५ वर्षात याच वर्षी वाढ कशी झाली हा आणखी निर्माण होणार सवाल आहे.ते काही असो दिवसेंदिवस हे असंतुलन वाढत आहे हे खरे आहे.त्यामुळे वारंवार पूर,उष्णता वाढ,विषम वातावरण हे प्रश्न दिवसेंदिवस वाढणार आहे.याची तयारी प्रशासन आणि राजकीय व्यवस्था यांनी करायला हवी आहे. प्रत्येक गोष्ट सरकार करेल या वृत्ती नागरिकांना सोडाव्या लागणार आहे.तरच खऱ्या अर्थाने यावर मात करता येणार आहे.त्यासाठी एक उदाहरण देणे गरजेचे आहे.२००६ च्या पुरात पुणतांबा फाट्यावरील अवजड वहाने बुडाली असल्याचे अनेकांनी पाहिले असेल.त्या नंतर जुनीगंगा देवी मंदिराजवळ असलेला नगर-मनमाड रस्त्यावर असलेला पूल (नळ्या ऐवजी) मोऱ्या बांधून तयार केला असता कोपरगाव शहर बुडण्याची प्रक्रिया बंद झाली आहे.त्यावेळी सदर ठेकेदाराने त्या ठिकाणी अशाच खंदकनाल्यात टाकलेल्या नळ्या सारख्याच नळ्या जुन्या गंगेत टाकल्या होत्या.त्यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी त्या ठेकेदारास जोरदार विरोध केला होता.व मोऱ्या बांधण्यास प्रवृत्त केले होते.त्यामुळे कोपरगाव शहर पुरापासून मुक्त झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.कारण तेंव्हा पासून वाढीव पुराचे नियमन या जुन्या गंगेतील पुलातील पाण्याचे पर्यायी मार्गाने वहन होत आहे.व शहरात पुरस्थितीं निर्माण होत नाही.एवढेच नव्हे तर त्या जुन्या पुलाला तडा गेला होता.तो तालुका प्रशासनाच्या लक्षात आणून दिला होता.त्यामुळे सावित्री नदीवरील घटनेची पूनरावृत्ती टळली होती.

खंदक नाला हा उत्तरेकडून येऊन तो पूर्वेकडे वळतो पूर्वी तो पन्नास ते साठ फूट रुंदीचा होता.मात्र अनेकांनी आपल्या व्यवसाय आणि घराची भूक भगविण्यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे.त्यामुळे तोच नाला आता केवळ दहा-पंधरा उरला आहे.त्यामुळे नैसर्गिक स्र्रोत अडवला जात आहे.परिणाम समोर आहेच,गॅरेज लाईन,खडकी उपनगर,कर्मवीरनगर,द्वारकानगरी,बैलबाजार रोड वस्ती,संजय नगरचा उत्तर भाग आदी ठिकाणे अख्खी पाण्यात गेली होती.शिर्डीत हेच झाले आहे.त्यामुळे नैसर्गिक स्र्रोत अडवणे जसे शिर्डी करांना अडचणीचे ठरले आहे.तीच स्थिती कोपरगाव शहरातील खंदक नाल्याची झाली आहे.

कर्मवीर नगरात इंदिरापथ रस्त्यावर मोऱ्या टाकून पूल केल्याने नैसर्गिक जलप्रवाह अडवला गेला नाही मात्र त्याच शेजारी पूर्वेस असलेला अनाधिकृत नळ्या टाकून बांधलेला ‘पूल’ पूर वाढण्यास कारणीभूत ठरला आहे.हे अनेकांच्या लक्षात आले असेल.त्यामुळे नजीकची घरे पाण्याखाली गेली हे सांगण्यास कोण ज्योतिषाची गरज नाही.या नैसर्गिक प्रवाहावर अडचण निर्माण कराल तर तो तुमच्यावर अतिक्रमण करील हा ‘क्रियेस प्रतिक्रिया’ साधा नैसर्गिक नियम ध्यानात ठेवावा लागेल.कर्मवीरनगर पाण्यात जाण्यास कारणीभूत ठरणारा पश्चिम बाजूस असलेला पण वर्तमानात बुजवला गेलेला स्र्रोत पुन्हा पूर्ववत करावा लागणार आहे.

त्यामुळे नगरपरिषद प्रशासनास या नैसर्गिक जलस्र्रोतांवरील अतिक्रमण हटवून मात करावी लागणार आहे.’हा कार्यकर्ता अमुक नेत्यांचा’,’तो’तमुक नेत्याचा’ असे म्हटलं तर काहींही होणार नाही.परिणामी,’येऱ्या माझ्या मागल्या’ अशी अवस्था होईल आणि सर्व मुसळ केरात जाण्याचा धोका आहे तो वेळीच ओळखावा लागणार आहे.अन्यथा अतिक्रमण मोहिमेचे अर्धवट सोडून देण्याचा जो प्रताप झाला तोच येथे झाला तर येथे माफी नाही.शहराचा तलाव व्हायला वेळ लागणार नाही याची जाणीव अधिकाऱ्याना ठेवावी लागणार आहे.अधिकारी तीन वर्ष येतील आणि जातील पण येथील नागरिकांना नगरबुडी पासून वाचण्यासाठी शहाणपण येथील तो सुदिन !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close