महसूल विभाग
प्रशासनाने नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवायला हव्या – …या नेत्याचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या प्रगतीचा विचार करतांना नागरिकांच्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजे आणि त्यासाठी आपले प्रशासन गतिमान असले अशी अपेक्षा बाळगली होती म्हणूनच यात्यांच्या स्मरणार्थ महायुती शासनाने त्यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ देण्याचे जाहीर केले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या जास्तीत जास्त अडचणी कशा सोडवता येतील यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.प्रशासनाकडून जास्तीत जास्त काम मार्गी लावून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.त्यामुळे नागरीकांना केवळ शिबिराच्या दिवशीच गतिमान सेवा न देता वर्षभर प्रशासनाचे काम गतिमान कसे राहील यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सामुहिक प्रयत्न करावे”- आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून जिल्हा वार्षिक योजनेमधून ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचे नामकरण ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ असे करण्यात आले असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत केली होती त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली असून कोपरगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी प्रदर्शन चॅरीटेबल ट्रस्ट हॉल येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

सदर प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे,तहसीलदार महेश सावंत,कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे,गटविकास अधिकारी स्वप्निल वाळुंज,सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप दळवी,नगरपरिषद मुख्याधिकारी अजित निकत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,वनपरिक्षेत्र अधिकारी महेबूब शेख,नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,सहकारी संस्था सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष,भूमी अभिलेख उपअधीक्षक राजेंद्र खरोटे,बालविकास प्रकल्प अधिकारी रुपाली धुमाळ आदींसह सर्व विभागांचे शासकीय अधिकारी,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,संचालक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व संलग्न संस्थांचे पदाधिकारी,आजी-माजी नगरसेवक,लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शासनाकडून नागरिकांना लाभाचे वितरण वेळेत झाले पाहिजे किंवा शासनाच्या माध्यमातून नागरीकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजे अशी अपेक्षा नेहमी स्व.अजित पवार यांची होती आणि हीच अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांची पण आहे.स्व.अजित पवार हे हाडाचे शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण असलेले दूरदृष्टीचे नेतृत्व होते.शेती,दुग्ध व्यवसाय,पोल्ट्री,भाजीपाला,साखर कारखाने,सहकारी बँका,पतसंस्था,दूध संस्था आणि मार्केट कमिट्यांपासून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूचा त्यांचा अभ्यास दांडगा होता.त्याचबरोबर नगर विकास,ग्रामविकास,सहकार यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवरील त्यांचे प्रभुत्व आणि शहरी विकासाविषयीची त्यांची दूरदृष्टी विशेष होती. कामाच्या बाबतीत स्वत:शिस्तप्रिय असल्यामुळे प्रशासनेही शिस्त पाळून नागरीकांचे प्रश्न वेळेत सोडविले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता.त्यामुळे त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या गतिमान नागरी सेवा पुरस्काराचा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उद्देश लक्षात घेवून नागरीकांना उत्कृष्ट सेवा देण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे लक्षवेधी काम सुरु आहे.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेब्रुवारी महिन्यात सुरु केलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे अभियान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून राबवीले जात आहे.लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या जास्तीत जास्त अडचणी कशा सोडवता येतील यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.प्रशासनाकडून जास्तीत जास्त काम मार्गी लावून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.त्यामुळे नागरीकांना केवळ शिबिराच्या दिवशीच गतिमान सेवा न देता वर्षभर प्रशासनाचे काम गतिमान कसे राहील यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सामुहिक प्रयत्न करावे.शासनाच्या सर्व लाभाच्या योजनांचा सर्वाधिक लाभ कोपरगाव मतदार संघातील पात्र आणि गरजू नागरीकांना कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आ.काळे यांनी शेवटी केले आहे.



