जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

अतिक्रमणे कायम करण्यासाठी ग्रामस्थांची बि.डी.ओ.कंडे धाव!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील गायरान जमिनीतील अतिक्रमण मुद्दा राज्यभर गाजलेला असताना आता हिंगणी येथील अतिक्रमण मुद्दा गाजण्यास सुरुवात झाली असून येथील दोन तक्रारदारांनी तेथील अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला असल्याने संतापलेल्या ग्रामस्थानी आज कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्याकडे धाव घेऊन घेराव घालत संबधित अतिक्रमण नवीन कायद्यानुसार नियमांकुल करावे अशी मागणी केली आहे.

हिंगणी येथील अतिक्रमणधारक यांची तक्रार ऐकून घेताना गटविकास अधिकारी संदीप दळवी,ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे आदी.

“राज्यातील सन 2011 पूर्वीची अतिक्रमणे कायम व नियमांकुल करण्याचा शासन आदेश दिला असला तरी सदर प्रस्ताव वर्तमानस्थितीत भूमिअभिलेख कार्यवाहीसाठी रवाना झाला असून तो आल्यानंतर त्यावर उचित कारवाई केली जाईल”-संदीप दळवी,गटविकास अधिकारी,कोपरगाव पंचायत समिती.

   महाराष्ट्र शासनाने (महसूल व वनविभागाने) जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार,१ जानेवारी २०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे ठराविक अटींवर नियमित (कायम) करण्यात येत आहे अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी केली आहे.गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा देणाऱ्या या योजनेच्या काही अटी शर्ती निश्चित केल्या आहेत.त्यात लाभार्थ्याला  ५०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य कायम केले जाणार आहे.त्यासाठी ५०० ते १५०० चौरस फुटांपर्यंतच्या अतिरिक्त क्षेत्रासाठी बाजारमूल्याच्या १० टक्के शुल्क आकारले जाणार आहे.त्यासाठी वन जमीन वगळून इतर सर्व शासकीय जमिनीवरील निवासी बांधकामांना याचा लाभ मिळणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे राज्यातील अनेक अतिक्रमणधारकांना याचा लाभ होणार आहे.मात्र अद्याप ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ही अतिक्रमणे कायम असून त्यातून मार्ग कसा काढायचा या समस्येत ग्रामस्थ अडकले असल्याचे दिसून येत आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणून कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथील तक्रार समोर आली आहे.या ठिकाणी 21,96,97 मध्ये अनेक भूमिहीन ग्रामस्थानी रहिवासी कारणासाठी अतिक्रमण केले असल्याचे दिसून येत आहे.यातील काही नागरिकांनी त्याला हरकत घेतली आहे.व सदरची अतिक्रमणे काढून टाकावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे वारंवार केली आहे.त्यामुळे हिंगणी येथील ग्रामस्थ घाबरून गेले आहे.त्यांनी आज हिंगणी येथील अर्जदार अनिल उत्तम गंगावणे व उत्तम रंगनाथ गंगावणे याचे विरुद्ध तक्रार करून दाद मागितली आहे.

हिंगणी येथील अतिक्रमणधारक यांची तक्रार करताना दिसत आहेत.

  त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आम्ही गट क्रमांक 03 मध्ये सन -2011 पूर्वीपासून राहत असून सरकारने  या पूर्वी रहिवास असलेल्या ग्रामस्थांना दिनाक 25 मार्च 2026 रोजी अभय दिले असून त्यांची अतिक्रमणे कायम व नियमांकुल करण्याचा आदेश दिला आहे.त्यासाठी 31 डिसेंबर 2026 ही अंतिम मुदत दिली आहे.त्यासाठी आम्ही हिंगणी येथील ग्रामस्थानी गावठाण हद्द वाढीचा प्रस्ताव सन-2024 साली अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला आहे.तो मंजूर होणार असल्याचा दावा केला आहे.त्यासाठी मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना आदेश दिले असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे कोपरगाव पंचायत समितीमार्फत अतिक्रमण काढू नये असे आवाहन केले आहे.

   दरम्यान त्याच गावातील दोन इसम अनिल उत्तम गंगावणे व उत्तम रंगनाथ गंगावणे हे वारंवार वैयक्तिक काही नागरिकांशी त्यांचा वाद असल्याचे कारणावरून सरकारी दरबारी आँनलाईन तक्रारी करून ग्रामस्थाना वेठीस धरत आहे.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ते वैयक्तिक कारणावरून गावास वेठीस धरत असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे कोपरगाव पंचायत समितीच्या प्रशासनाने त्यांच्या दबावाला बळी पडून ही अतिक्रमणे काढू नये व सदर ग्रामस्थांचा रहिवास असलेली घरे नियमाकुल करावी अशी मागणी शेवटी केली आहे.

   या निवेदनावर हिंगणी येथील हिराबाई निवृत्ती माळी,वनिता बाळासाहेब माळी,अलका बाळासाहेब भवर,साखरबाई रतन भवर,मीराबाई कैलास भवर,गंगुबाई जनार्दन पवार,निकिता रोहित बर्डे,प्रमिला सुनील गोधडे,धनुबाई मारुती गोधडे आदीसह 66 ग्रामस्थ आणि महिला रहिवाशांच्या सह्या आहेत.त्यांनी यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांना घेराव घालून आपल्या मागण्या  मान्य कराव्या अशी गळ घातली होती.

   दरम्यान त्यावेळी गटविकास अधिकारी दळवी यांचेसह ग्रामपंचायत विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे हे उपस्थित होते.त्यांनी,”सदर प्रस्ताव वर्तमान स्थितीत भूमिअभिलेख कार्यवाहीसाठी रवाना झाला असून त्यानंतर उचित कारवाई केली जाईल” असे आश्वासन दिले आहे.त्यानंतर सदर ग्रामस्थानी आपले घर गाठले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close