जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

उर्वरित गाळ्यांवर आज बुलडोझर…!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील गोवंश हत्या ही चिंतेची बाब असून गोदावरी नदीत जाणारे रक्ताचे पाट थांबविण्यासाठी प्रशासनाने दि.26 मे रोजी  केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर आज पुन्हा एकदा संजयनगर भागातील आयेशा कॉलनीतील उर्वरित 24 अतिक्रमण धारकांवर कारवाई करून जोराचा दणका दिला आहे.त्यामुळे शहरात आता पुन्हा गोवंश हत्या बंद होईल अशी आशा व्यक्त हिंदू बांधवांकडून होत आहे.

एका माहितीनुसार कोपरगाव शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी राज्याच्या शिखर नेतृत्वाकडेही या गलथान कारभाबाबत तक्रारी केल्या असल्याची माहिती आहे.परिणामी राज्याच्या राजधानीतून सूत्रे हलली असून अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी यांना सक्त आदेश दिले गेले होते.त्यांनी कोपरगाव शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबत फैलावर घेऊन,” जे अतिक्रमण असतील ती पहिले काढून टाका” असे फर्मान काढले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.यामुळे काल रात्रीच याबाबत संबंधित अतिक्रमण धारकांना ताकीद दिली होती.परिणाम आज समोर आला असून हिंदुत्ववादी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.ते किती दिवस टिकणार हा पुढचा अंक आहे.

   कोपरगाव शहरात सन-2017 साली विजय वहाडणे नगराध्यक्ष असताना ऐन शिवरात्रीच्या दिवशी नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत गोवंश हत्या करणारी मोठी टोळी पकडली होती.त्यांचे लागेबांधे थेट संगमनेर आणि गुजरातपर्यंत आढळून आले होते.कोपरगाव शहरात गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल करायची व तो माल संगमनेर मार्फत गुजरात,मुंबई आदी ठिकाणी पाठवायचा आणि बक्कळ कमाई करायची अशी पद्धत त्यावेळी आरोपींनी अवलंबली होती.त्यामागे अर्थातच कोपरगाव शहर हे गोवंश हत्या करणाऱ्या आरोपींना सुरक्षित ठिकाण मानले जात होते.त्यांना राजकीय संरक्षण होते हे वेगळे सांगणे नको.त्या रक्ताचा महापूर थेट पवित्र समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीत जाऊन त्याच पाण्याने भाविकांना विविध सण आणि पर्वणीच्या काळात पवित्र स्नान करावे लागत होते.एवढेच नाही तर त्याच रक्ताच्या पाण्याने देवादिकाना व अभिषेक घडत असल्याचे दिसून येत होते.मात्र मतांची लालसा पुढाऱ्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.ते वारंवार त्यात हस्तक्षेप करून गोवंश हत्या करणारांना मांडीवर बसवून घेत असल्याचे दिसून येत होते.परिणामी या बातम्यांनी अहिल्यानगर जिल्हा हादरला होता.

अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण रात्री 8.30 वाजता स्वतःहून काढून घेतले तो क्षण.

   दरम्यान त्यावेळी श्री क्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांनी याप्रश्नी कठोर भूमिका घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.मात्र हा प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढत होता.आणि काँग्रेसी पुढारी त्याची पाठराखण करत होते.मात्र आता हेच काँग्रेसी पुढारी भाजपमध्ये जाऊन त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये सफलसंपूर्ण पावन झाल्याने त्यांची पाचावर धारण बसली आहे.मात्र तरीही ते आड पडद्याने त्यांना संरक्षण देताना दिसून येत आहे.दि.26 मे रोजी हिंदुत्ववादी संघटनाच्या दबावामुळे झुकून त्यांनी कारवाई केली असल्याचे उघड झाले होते.मात्र त्याच ठिकाणी असलेल्या सर्व्हे नंबर 215/ 74 मधील नगरपरिषदेच्या जागेत बांधलेले गाळे मात्र तसेच राखून ठेवले होते.त्याबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी मोठा आवाज उठवला होता व काल त्यांनी पोलिस निरीक्षक कुंभार यांचे दालनात जाऊन कोपरगाव बंदची हाक दिली होती.त्यामुळे प्रशासन दबावात आले होते.त्यांनी त्यानंतर आपले डोळे उघडून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.त्या आश्वासनानुसार आज सकाळी ही कारवाई करण्यात आली होती.त्यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिसा निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या यंत्रणांना बरोबर घेऊन हा उपक्रम राबवला आहे.

 

कोपरगाव शहरातील संजयनगर,आयेशा कॉलनीतील सर्व्हे क्र.215/74 मधील पालिकेच्या जागेत स्वखर्चाने बांधलेले उर्वरीत गाळे काढण्याचे काम नगरपरिषद आणि पोलिस अधिकाऱ्यांनी अगत्याने केले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे गोदावरी या दक्षिण गंगेत आता तरी भगवंताला आणि त्यांच्या भक्तांना हिंदुत्ववादी सरकारच्या काळात शुद्ध जलाने अभिषेक करता येईल असा आशावाद निर्माण झाला आहे.आता हे वातावरण किती दिवस टिकणार हा नंतरचा आणि खरा प्रश्न आहे.

 

     दरम्यान या कारवाईसाठी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीही प्रशासनाकडे तगादा लावला होता व आंदोलनाचा इशारा दिला होता.शिवाय एका माहितीनुसार काही हिंदुत्ववादी संघटनांनी राज्याच्या शिखर नेतृत्वाकडेही या गलथान कारभाबाबत तक्रारी केल्या असल्याची माहिती आहे.परिणामी राज्याच्या राजधानीतून सूत्रे हलली असून अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी यांना सक्त आदेश दिले गेले होते.त्यांनी कोपरगाव शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांना याबाबत फैलावर घेऊन,” जे अतिक्रमण असतील ती पहिले काढून टाका” असे फर्मान काढले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.यामुळे काल रात्रीच याबाबत संबंधित अतिक्रमण धारकांना ताकीद दिली होती.आणि त्यानंतर त्यांतील काहीना शहाणपण येऊन त्याने रात्रीच आपले गाळे काढून घेतले होते.तर आज उर्वरीत 24 गाळे काढण्याचे काम नगरपरिषद आणि पोलिस अधिकाऱ्यांनी अगत्याने केले असल्याचे दिसून आले आहे.दहा दिवसातील ही दुसरी कारवाई गणली गेली आहे.त्यामुळे गोदावरी या दक्षिण गंगेत आता तरी भगवंताला आणि त्यांच्या भक्तांना हिंदुत्ववादी सरकारच्या काळात शुद्ध जलाने अभिषेक करता येईल असा आशावाद निर्माण झाला आहे.आता हे वातावरण किती दिवस टिकणार हा खरा प्रश्न आहे.मिळालेल्या माहिती नुसार आजही एक गट हा गोवंश हत्या करणाऱ्या घटकांना आश्रय देत असल्याची माहिती असून ते हिंदुत्ववादी संघटनाच्या रडारवर आले असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close