जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

तळेगाव मार्गे संगमनेर रस्त्याला ए.डी.बी.चा निधी नाही,ग्रामस्थ वाऱ्यावर !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
 
   उत्तर भारताला पुणे आणि दक्षिण भारताला जोडण्यात अहम भूमिका निभावणाऱ्या व दोन राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध असलेल्या 34.2 कि.मी.राज्य मार्गासाठी अनेक नागरिकांचे बळी जाऊनही आशिया डेव्हलपमेंट बँकेकडून (ए.डी.बी.) बँकेकडून अद्याप एक कवडीची तरतूद झाली नसल्याची माहिती,’माहिती अधिकारात’ नानासाहेब जवरे यांना प्राप्त झाली आहे.परिणामी यावर्षीही या भागातील शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थाना सार्वजनिक बांधकाम विभागाने वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचे कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी,”तळेगाव दिघे मार्गे संगमनेर मार्गाच्या खराब पट्ट्यासाठी 17 कोटींची आर्थिक तरतूद केली असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे.मात्र वर्तमानात स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक आचार संहितेची अडचण निर्माण झाल्याने निदान पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त होण्याची शक्यता तूर्त सपशेल मावळली असल्याचे बोलले जात आहे.परिणामी दिवाळी नंतरच हे काम सुरू होणार असल्याचे दिसत आहे.

   कोपरगाव आणि विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था हा मोठा चिंतेचा विषय ठरत आलेला आहे.त्यात अद्याप काहीही उतार आलेला नाही.त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना चार ते पाच तासांचा कालावधी लोटतो तर मरण यातना भोगाव्या लागतात त्या वेगळ्या आहेत.अवजड आणि हलक्या प्रवासी वाहनाची वित्तीय हानी वेगळीच आहे.त्याची कोणतीही मोजदाद नाही.त्याच पठडीतील रस्ता म्हणून तळेगाव दिघे मार्गे संगमनेर या रस्त्याची मोठी ख्याती असून त्याची वर्तमान दोन वर्षांपासून मोठी दैना झालेली आहे.त्यामुळे एखादा अपघात झाला आणि त्यात एखादा विद्यार्थी बळी गेला की ग्रामस्थ संतप्त होऊन,’रास्ता रोको’ सारखे आंदोलन करतात.चार दिवसांचा विरोध मावळला की पुन्हा एकदा,”…येरे माझ्या मागल्या अन् ताक कण्या चांगल्या” अशी लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थिती निर्माण होते.त्याची दखल ना लोकप्रतिनिधींना घ्यावी वाटते ना सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना त्यांना आपले हात ओले झाले की,” जनता मरो अथवा खड्ड्यात जावो”  यांचेशी काही देणे घेणे नाही असे निष्ठूर वर्तन सुरू असते.त्यांनाही एकतर्फी दोष देता येणार नाही.

  सर्व छायाचित्रे संकल्पित.

“वर्तमानात सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी मागितलेल्या माहिती अधिकारात,”  आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत रा.म.मा.२२२ तोलारखिंड-सावरचोळ-कोतुळ-संगमनेर-तळेगाव-कोपरगाव-पढेगांव-उक्कडगाव-वैजापूर 44 कि.मी.रस्त्यासाठी 528 कोटींची तरतूद होण्याची शक्यता मावळली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठी किंमत चुकवावी लागणार असे दिसून येत आहे”-सारिका विजय थोरात,सरपंच,जवळके ग्रामपंचायत,ता.कोपरगाव.

   दरम्यान अलीकडील काळात अधिकाऱ्यांचा टक्का पाहून ती लस आता लोकप्रतिनिधीपर्यंत पोहचली असल्याचे बोलले जात आहे.परिणामी ठेकेदाराला खडीला डांबर लावायला पैसाच शिल्लक राहत नसल्याची बातमी आहे.स्वाभाविकपणे तो डांबरात डिझेल आणि खराब ऑईल ओतून काम करताना दिसत आहे.परिणामी पुढे डांबरी रस्त्याचे काम सुरू आणि मागे रस्ते उखडण्याचे काम एकाचवेळी सूरु होत असल्याचे वास्तव आणि सामाजिक संकेतस्थळावर अनेक चलचित्रफिती नागरिकांना पाहायला मिळत आहेत.मात्र या टक्क्याची किंमत सामान्य नागरिकांना आपल्या जीवानिशी चुकवावी लागत आहे.परिणामी त्यात अनेक हकनाक बळी जात आहेत.सन-2018 साली आशिया डेव्हलपमेंट बँकेचा या मार्गासाठी 189 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले असताना त्याचा पाठपुरावाच झाला नाही परिणामी त्या निधीला अन्यत्र पाय फुटले असल्याचे बोलले जात आहे.आता पुन्हा एकदा या मार्गासाठी “आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प अंतर्गत रा.म.मा.२२२तोलारखिंड-सावरचोळ-कोतुळ-संगमनेर-तळेगाव-कोपरगाव-पढेगांव-उक्कडगाव-वैजापूर रस्ता (रा.मा. ६५) कि.मी. ८२/००० ते १३६/५०० (भाग- तळेगाव ते जिल्हा हद्द एकुण लांबी एकुण लांबी ४४ कि.मी.” या कामाच्या संदर्भात (संदर्भ -मुअ (को) व प्रसं (बासप्र)/एडीबी/१२७/२०२५ दि.०३.०२.२०२५ ) या मधील कामाचा समावेश आशियाई विकास बँक अर्थसहाय्यातून अद्याप 528 कोटींचा निधी प्राप्त झालेला नाही.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकणचे उपअभियंता अतुल गुरव यांनी आमच्या प्रतिनिधीस माहिती अधिकारात नुकतीच दिली आहे.त्यामुळे यावर्षी पावसाळ्यापूर्वी ही हा रस्ता होण्याची शक्यता मावळली असल्याचे बोलले जात आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांचे कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी,” तळेगाव दिघे मार्गे संगमनेर मार्गाच्या खराब पट्ट्यासाठी 17 कोटींची आर्थिक तरतूद केली असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे.मात्र वर्तमानात स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक आचार संहितेची अडचण निर्माण झाल्याने निदान पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त होण्याची शक्यता तूर्त सपशेल मावळली असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे ‘आधीच दुष्काळ आणि त्यात तेरावा महिना’ अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close