शैक्षणिक
प्रा.सुवर्णा शिंदे यांना रसायनशास्त्रात पी.एच.डी.

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव रयत शिक्षण संस्था संचलित श्री सद्गुरु गंगागीर महाराज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका प्रा.सुवर्णा देविदास शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.’ॲप्लिकेशन ऑफ आयोनिक लिक्विड्स इन सिंथेसिस ऑफ ऑक्सिजन अँड नायट्रोजन हेटेरोसायकल्स’ या विषयावर त्यांनी विद्यापीठात संशोधन प्रबंध सादर केला होता.

दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रयासनशास्त्र विभाग प्रमुख कॅप्टन प्रा.डॉ.सुरेश गायकवाड यांनी बाह्य परिक्षण केले.हे संशोधन हरित रसायनशास्त्र,औषधनिर्मिती आणि आधुनिक सेंद्रिय संश्लेषणासाठी उपयुक्त ठरणार असून आयोनिक लिक्विड्सच्या साहाय्याने सुरक्षित,जलद,कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने महत्त्वपूर्ण हेटेरोसायक्लिक संयुगांच्या निर्मितीस चालना मिळणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
संशोधनासाठी प्रा.डॉ.मोहन सांगळे आणि डॉ.विलास गाडे यांचे मार्गदर्शन लाभले.पी.एच.डी.च्या अंतिम मौखिक परीक्षेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सतीश परदेशी यांनी चेअरमन म्हणून काम पाहिले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रयासनशास्त्र विभाग प्रमुख कॅप्टन प्रा.डॉ.सुरेश गायकवाड यांनी बाह्य परिक्षण केले.हे संशोधन हरित रसायनशास्त्र,औषधनिर्मिती आणि आधुनिक सेंद्रिय संश्लेषणासाठी उपयुक्त ठरणार असून आयोनिक लिक्विड्सच्या साहाय्याने सुरक्षित,जलद,कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने महत्त्वपूर्ण हेटेरोसायक्लिक संयुगांच्या निर्मितीस चालना मिळणार आहे.
या यशाबद्दल विधानपरिषद सदस्य विवेक कोल्हे,रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख ॲड.भगीरथ शिंदे,रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संदीप वर्पे,प्राचार्य डॉ.माधव सरोदे,उपप्राचार्य डॉ.घनश्याम भगत,उपप्राचार्य डॉ.बंडेराव तऱ्हाळ,आयक्यूएसी चेअरमन डॉ.निलेश मालपुरे,विभागप्रमुख डॉ.प्रतिभा रांधवणे तसेच कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी आदींनी अभिनंदन केले.



