जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या महाविद्यालयाचे बारावीत लक्षवेधी यश      

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)
           
   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या यावर्षीच्या बारावी बोर्ड परीक्षेत के.बी.रोहमारे महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवत कोपरगाव परिसरासह जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यशस्वी कामगिरी केली आहे.

कोपरगाव येथील के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा निकाल हाती आला असून यात विज्ञान शाखेचा ९५% निकाल लागला असून या शाखेत कु.सायली योगेश वदक ही ७९% गुण मिळवून प्रथम आलेली आहे.तसेच रुपेश वाल्मीक वाणी हा ७७.५०% तर कु.भक्ती संदीप इंगळे ही ७४.३३% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १२वी (HSC) परीक्षा निकाल २ मे २०२६ रोजी जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ८९.७९% लागला आहे.त्यात कोपरगाव येथील के.बी.रोहमारे महाविद्यालयाचा निकाल हाती आला असून यात विज्ञान शाखेचा ९५% निकाल लागला असून या शाखेत कु.सायली योगेश वदक ही ७९% गुण मिळवून प्रथम आलेली आहे.तसेच रुपेश वाल्मीक वाणी हा ७७.५०% तर कु.भक्ती संदीप इंगळे ही ७४.३३% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.

तर वाणिज्य शाखेचा ८६% निकाल लागला असून वाणिज्य शाखेत विनीत नितीन आढाव हा ९०.३३% गुण मिळवून प्रथम आला आहे.तसेच कु.वेदांती गजेंद्र आदमाने ही ८५.८३% तर कु.रितिका रवींद्र देशमुख ही ८५.३३% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहे.

याशिवाय कला शाखेचा ६७% निकाल लागला असून शाखेत कु.खतिजा मोयद्दिन शेख ही ८१% गुण मिळवून प्रथम आलेली आहे.तसेच कु.साक्षी बाबुराव खंडागळे ही ७७.५०% तर कु.दिव्या नितीन तांबे ही ७७% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.

  याशिवाय के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या शाळा गुणवत्ता मुल्यांकान व आश्वासन आराखडा (SQAAF) या मुल्यांकानात अ+ श्रेणी हा दर्जा मिळालेला आहे.ही श्रेणी मिळवलेले हे जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे.आजच्या या निकालाने महाविद्यालयाच्या शिरोपचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.विद्यार्थ्यानी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव अ‍ॅड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे,उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब सोनवणे,कार्यालयीन अधिक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे आदींनी सर्वच गुणवंत विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close