कोपरगाव शहर वृत्त
पालिकेच्या सर्वसाधारण सभेबाबत राष्ट्रवादीचा आश्चर्यकारक निर्णय…!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने पत्रकार परीषद आयोजित केली त्यावेळी कोपरगाव नगरपरिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीला बहिष्कार टाकला असल्याची माहिती विरोधी पक्षाच्या गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी दिली आहे.

“ज्यांनी निधी आणि जागा दिली त्यांच्यावर हल्ला होणे दुर्दैवी आहे.आम्ही जो निधी आणू त्याचे भूमिपूजन आम्ही करू.त्यांनी आणलेल्या निधीचे उद्घाटन करणे त्यास आमचा आक्षेप नाही.एवढ्यावर ही मंडळी थांबली नाही भूमिपूजन करताना आमचे नारळ त्यांनी वापरले” असा आरोप सचिन गवारे यांनी केला त्यावेळी उपस्थितांत हशा पिकला आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे आज सर्वसाधारण सभा आयोजित केली असल्याच्या पार्श्वभूमीवर आज गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाकार्यक्ष कृष्णा आढाव,कोपरगाव नगरपरिषद राष्ट्रवादीचे गटनेते गौरी मंदार पहाडे,माजी शहर प्रमुख सुनील गंगूले,नगरसेवक
बाळासाहेब आढाव,रमेश गवळी,वाल्मीक अहिरे,मेहमूद सय्यद,फकीर कुरेशी,मंदार पहाडे,शैलेश साबळे,निर्मला आढाव,सोनम त्रिभुवन,वाल्मीक लहिरे,बाळासाहेब रुईकर,अमित आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नगरसेवक मेहमूद सय्यद म्हणाले की,”निवारा परिसरात बाळासाहेब आढाव यांच्यावर गुंडांचा वापर करून भ्याड हल्ला झाला आहे.आयत्या पिठावर रेषा मारण्याचे काम कोल्हे गट करत आहेत.आ.आशुतोष काळे यांनी आणलेल्या निधीवर श्रेयवादाचा डल्ला मारत आहेत.त्यामुळे आम्ही या कृत्याचा निषेध व्यक्त करत आहे.याबाबत पोलिस ठाण्यात काही तक्रार केली का असा सवाल केला असता त्यांनी नकार दिला आहे.
यावेळी बाळासाहेब आढाव म्हणाले की,” मला हरिभाऊ गिरमे यांनी बोलावून घेतले होते व हल्ला केला आहे.आमची जागा त्याठिकाणी आहे.१५ एकरांपैकी एकूण ०.५६ आर जागा दिली आहे.मात्र नगरपरिषदेने किती दिली याचा खुलासा केला नाही.आमचे उद्घाटनावर आक्षेप आहे.ते करणाऱ्यावर नाही.त्यांचे भूमिपूजन झाल्यावर आम्ही भूमिपूजन करणार होतो.मात्र त्याआधी त्यांनी आम्हाला बोलावून हा हल्ला केल्याने वातावरण चिघळले असल्याचा दावा केला आहे.कार्यारंभ आदेश येण्यास उशीर झाला आहे.आम्ही त्यांच्या कार्यक्रमापासून दूर होतो.यावेळी गंगूले यांनी आ.आशुतोष काळे यांनी जागा आणि निधी दिला आणि त्यांच्यावर हे आरोप होणे निषेधार्ह आहे.ज्यांनी निधी आणि जागा दिली त्यांच्यावर हल्ला होणे दुर्दैवी आहे.आम्ही जो निधी आणू त्याचे भूमिपूजन आम्ही करू.त्यांनी आणलेल्या निधीचे उद्घाटन करणे त्यास आमचा आक्षेप नाही.एवढ्यावर ही मंडळी थांबली नाही भूमिपूजन करताना आमचे नारळ त्यांनी वापरले असा आरोप सचिन गवारे यांनी केला त्यावेळी उपस्थितांत हशा पिकला आहे.बिगरशेती प्लॉट मधून रस्ता काढला असल्याचा आरोप केला आहे.दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत गोपनीय सूत्रांकडून माहिती काढली असता त्याला दुजोरा मिळाला नाही.मात्र सदर खर्च आयोजकांच्या वतीने करण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
यावेळी सुनील गंगूले यांनी साठवण तलावाच्या दुरुस्ती ऐवजी काँक्रीटीकरण करावे अशी मागणी केली असल्याचे सांगितले आहे.ज्यानी नगरपरिषदेची २८ कामांचा निधी परत पाठवला तलावासाठी अडथळे आणले त्यांनी विकासाचा आव आणावा यासारखे आश्चर्य वाटत असल्याची कोपरखिळी मारली आहे.
यावेळी राष्ट्रवादीच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी बाळासाहेब आढाव यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.नागरिकांच्या अपेक्षा सत्ताधारी गट पूर्ण करू शकलेला नाही.त्यामुळे वरील घटनेच्या निषेधार्थ आजच्या सर्वसाधारण सभेवर आमच्या गटाने बहिष्कार टाकला असल्याची माहिती पहाडे यांनी दिली आहे.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब रुईकर,वाल्मीक अहिरे,रमेश गवळी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.



