गुन्हे विषयक
खोटे लग्न लावले,०६ जणांवर गुन्हा दाखल !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील एकास खोट्या लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडील सोने,चांदीसह रोख रक्कम २.२९ लाख रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी नाशिक येथील आरोपी कशीष सुकदेव भालेराव,जमता सुकदेव भालेराव,भूमी किरण निकम सर्व रा.जत्रा चौक,आडगाव नाका,नाशिक,अशोक तान्हाजी काळे,वनिता अशोक काळे दोन्ही रा.आंगणगाव ता.येवला,गोकुळ चिंदा पानकर रा.मदरतेरेसा चौका जवळ,नाशिक आदी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

यातील आरोपी अशोक काळे आणि वनिता काळे यांनी तुमच्या मुलाला आम्ही मुलगी दाखवतो व तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो असे आश्वासन देऊन त्यांचेकडून सोने,चांदी आणि रोख रक्कम रुपये ०२ लाख २९ हजार रुपयांची मागणी करून बनावट नवरी उभी करून माहेगाव देशमुख येथे लग्न लावून दिले होते.मात्र नंतर सदर बनावट नवऱ्या मुलीने पहिल्याच मुळास पोबारा केला होता.
गत काही वर्षात मुलींची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे.मुले आणि मुलीत यांच्यात मोठे असंतुलन निर्माण झाले आहे.त्यामुळे प्रत्येक पालकांच्या,मुलींच्या अपेक्षा वाढत गेल्या.पालक आपल्या मुलीसाठी चांगल्यातील चांगले स्थळ शोधू लागले.त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांचे लग्न होणे खूप अवघड झाले आहे.या समस्येमुळे गावातील लोक त्रस्त झाले आहे.जवळ-जवळ ३० ते ४० वर्षे वय झाले पण मुलांचे लग्न होत नाही.लग्न करताना मुलगा आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहे,घरदार,नोकरी,शेती या सर्व गोष्टींची चाचपणी केली जाते.विशेष म्हणजे पूर्वीच्या काळी मुलींना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते.घरचे लोक जे निर्णय घेतील तो मान्य करावा लागत होता.मुलींना बोलण्याची संधी नव्हती.पण आता काळ बदलला.मुली निर्णय घेऊ लागल्या आहेत.मुले आपले भविष्य सोडून मोबाईल मध्ये व्यस्त आहे.त्यामुळे लग्नाळू मुलांची संख्या मोठया प्रमाणावर वाढली आहे.त्याचा गैरफायदा असामाजिक तत्वांनी घेतला नाही तर नवल.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे उघड झाली आहे.

यातील घटना ही दि.२१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान घडली होती.यातील आरोपी अशोक काळे आणि वनिता काळे यांनी तुमच्या मुलाला आम्ही मुलगी दाखवतो व तुमच्या मुलाचे लग्न लावून देतो असे आश्वासन देऊन त्यांचेकडून सोने,चांदी आणि रोख रक्कम रुपये ०२ लाख २९ हजार रुपयांची मागणी करून बनावट नवरी उभी करून माहेगाव देशमुख येथे लग्न लावून दिले होते.मात्र नंतर सदर बनावट नवऱ्या मुलीने पहिल्याच मुळास पोबारा केला होता.फिर्यादीना त्यानंतर त्यांनी वारंवार मध्यस्थी असलेल्या काळे या जोडप्यास फोन करून मुलगी का येत नाही अशी विचारणा केली होती.मात्र ते टाळाटाळ करत होते.मात्र बराच कालावधी होऊन ही मध्यस्थ टाळाटाळ करत असल्याचे त्यांना आपली चूक झाल्याची आणि आपण फसवलो गेलो असल्याची जाणीव झाली असता त्यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्यांचे विरुद्ध गुन्हा क्रं.६०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३१६(२),३(५) प्रमाणे दाखल केला होता व पोलिस अधिकाऱ्यांकडे न्याय मागितला होता.
दरम्यान तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.त्यात त्यांना वरील सहा आरोपी निष्पन्न झाले होते.त्यात पोलिसांनी आडगाव नाका,जत्रा चौक,नाशिक येथील आरोपी कशीष सुकदेव भालेराव,जमता सुकदेव भालेराव,भूमी किरण निकम यांना शिताफीने ताब्यात घेतले असता त्यांना पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी आपली जबानी पोपटासारखी दिली असून आरोपाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्यांना अटक करून कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती.त्यात पोलिसांनी आपली खरी ओळख करून दिल्यावर त्यांनी या घटनेची कबुली दिली असल्याची माहिती आहे.त्यांनी फिर्यादीना फसवून घेतलेले ५५ हजारांचे सोने,चांदी आणि ०१ लाख ६९ हजारांची रोख रक्कम रुपये असे एकूण ०२ लाख २९ हजार रुपये गुमान काढून दिले आहे.या गुन्ह्यात त्यांना अशोक तान्हाजी काळे,वनिता अशोक काळे दोन्ही रा.आंगणगाव ता.येवला,गोकुळ चिंदा पानकर रा.मदरतेरेसा चौकाजवळ,नाशिक आदींनी मदत केली असल्याची माहिती उघड झाली आहे.त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान या कारवाईत जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे,अतिरिक्त पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप कोळी,पो.ना.आर.ओ.कारखेले,महिला पो.कॉन्स्टेबल ज्योती रहाणे,अनिता बलवे,पो.कॉन्स्टेबल जर्यादप गवारे,अंबादास बाघ,पो.हे.कॉन्स्टेबल संतोष दरेकर,सचिन धनाड,राम वेताळ आदींनी महत्वाची भूमिका निभावली आहे.या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


