जाहिरात-9423439946
दळणवळण

रखडलेल्या रस्ते,पुलांच्या कामांना येणार वेग-…यांची माहिती

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या कामांना गती मिळून वाहतुकीसाठी येत असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खा.प्रफुल्लभाई पटेल यांच्या समवेत नुकतीच दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याची माहिती हाती आली आहे.

मतदार संघातील रस्ते,पुलांच्या अडचणींबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा करतांना आ.काळे समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल.

  

  दरम्यान 'न्यूजसेवा'ने लावून धरलेला व शिर्डीच्या गर्दीच्या काळात वळण रस्ता म्हणून वापरलेला झगडे फाटा-वडगावपान मार्ग नादुरुस्त झाल्याची पहिल्यांदा कबुली दिली आहे.मात्र तो मार्ग राष्ट्रीय महामार्गात करण्याची मागणी टाळली असल्याचे दिसत आहे.

  कोपरगाव तालुक्यातील आणि मतदार संघातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.नगर मनमाड सह झगडे फाटा-वडगाव पान,टाकळी फाटा ते धामोरी,जवळके मार्गे शिर्डी वावी,या शिवाय जिल्हा मार्ग अवैध वाळू चोरी मुळे होत्याचे नव्हते झाले आहे.झगडे फाटा ते वडगाव पान मार्गावर अनेकांचे बळी गेले आहे,आजही जात आहे.नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली आहे.मात्र ते रस्ता अद्यापही राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित होत नाही.या पार्श्वभूमविर आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील रस्ते रखडलेले पूल आदींसाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.यामध्ये एन.एच.७५२ जी सावळीविहीर फाटा ते सेंधवा (मध्य प्रदेश) व एन.एच.१६० सिन्नर ते शिकोडी (कर्नाटक) या  दोन राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.यामध्ये एन.एच.७५२ जी राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्यात आले असून या महामार्गावरील पुणतांबा फाटा व बेट नाका येथील उड्डाणपुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे.तसेच पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एन.एच.१६० या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर फाटा व झगडे फाटा येथील उड्डाण-पुलांची कामे व रस्त्यांचे रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली असल्याचे कळते.

   दरम्यान ‘न्यूजसेवा’ने लावून धरलेला व शिर्डीच्या गर्दीच्या काळात वळण रस्ता म्हणून वापरलेला झगडे फाटा-वडगावपान मार्ग नादुरुस्त झाल्याची पहिल्यांदा कबुली दिली आहे.व भविष्यात झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याप्रमाणे या रस्त्याचीही अवस्था होवून या रस्त्यावरही अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यासाठी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा (राष्ट्रीय महामार्ग १६० बी) या मार्गाचे तातडीने सिमेंट काँक्रीटीकरण करणे गरजेचे असल्याचे असल्याचे सांगून झगडे फाटा ते वडगाव पान हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्याची मागणीला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून आले आहे.

   दरम्यान जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून कोपरगाव मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी केंद्रीय रस्ते निधीतून जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी केली.त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोपरगाव मतदारसंघातील रखडलेली रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना गती मिळणार असल्याचे आ.काळे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close