जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

पोलिसांनी फिर्यादीना ठाण्यात बसवून आरोपींना बोलावू नये-…या मंत्र्यांचे आवाहन

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  अहिल्यानगर जिल्ह्यात गुटख्यासह अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यावर पोलिस अधिकाऱ्यांनी वचक निर्माण करून गुन्हेगारी नियंत्रणात आणावी फिर्यादीना बसवून गुन्हेगारांना बोलावू नये (?)(अशी कोपरखिळी मारून) त्यासाठी आपण लागेल ती मदत करायला तयार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

बोलताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे दिसत आहे.

दरम्यान यावेळी आ.आशुतोष काळे यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी पोलिस प्रशासकीय कार्यालय व पोलिस निवासी इमारतीचे श्रेय माजी उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांना दिले आहे.तर त्यानंतर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी या सर्व इमारतींचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन टाकले असल्याने हा ऐन शिमग्याच्या दिवशी शिमगा केल्याने त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना या श्रेयवादावर,”बुरा न मानो होली है”ची कोटी केली त्यावर उपस्थितांत खसखस न पिकली तर नवल होते.

  महाराष्ट्र राज्य,पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित,मुंबई अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय,अहिल्यानगर कोपरगांव तालुका पोलीस ठाणे इमारत व ६४ पोलीस कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन समारंभ मंगळवार दि.०३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.आशुतोष काळे हे होते.

कार्यक्रमस्थळी उपस्थित जनसमुदाय दिसत आहे.

दरम्यान यावेळी मिळालेल्या माहितीनुसार ईशान्यगडावरील माय-लेकांनी गेले तीन दिवस या कामाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे हस्ते होऊ नये व त्याचे श्रेय आ.आशुतोष काळे आदींना मिळू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मंत्रालयात ठाण मांडले होते.मात्र त्यांनी नकार दिला असल्याची माहिती असून अखेर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे येतील यावर शिक्का मोर्तब झाल्यावर हे धरणे सुटल्याची खात्रीलायक माहिती आहे.मात्र त्यांनी ऐन वेळी अंगठा दाखवल्याने त्यांच्या पदरी निराशा आली असून सगळे मुसळ केरात गेले असल्याचे दिसून आले आहे.दरम्यान कडी तर तेंव्हा झाली सभापती राम शिंदे यांना येऊ न देण्यात मंत्री विखे आणि आ.काळे हे यशस्वी झाले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे सभापती शिंदे हे दिवसभर नॉट रिचेबल होते अशी चर्चा उपस्थितांत दिसून आली आहे.

  सदर प्रसंगी माजी आ.स्नेहलता कोल्हे,राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयते,संभाजी काळे,नितीन औताडे,गोदावरी तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगाव पालिकेचे अध्यक्ष पराग संधान,पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे,शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी चार फॉरेन्सिक पोलिस व्हॅनचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले आहे.

त्यावेळी पुढे बोलताना त्यांनी पोलिस इमारतीचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,स्व.अजित पवार यांनी दिला आणि त्याचा पाठपुरावा केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांना दिले आहे.नगर जिल्ह्याला पोलिस बळ कमी आहे ते ५०० वाढवून द्यावे अशी मागणी केली आहे.पोलिसांना झोकून देऊन उपयोग होत नाही.त्यातून वेळ मिळेल त्यात काम करावे लागते.घार्गे यांनी अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करा अशी मागणी केली आहे.निधीची काळजी करू नका,सीसीटीव्ही बसवा निधी देतो.घुटके आणि अंमली पदार्थ बंदी करा अशी मागणी केली आम्ही तुमच्या पाठीशी आहे.युवक पिढी बरबाद होत आहे.अमित शहा यांनी त्यारोधात मोहीम उघडली आहे.देशाला लागलेली कीड व चिंतेची बाब असल्याचे सांगून गुन्हेगारी कमी व्हायला हवी.समाजाच्या सर्व घटकांनी त्यास मदत करायला हवी असे आवाहन केले आहे.सामान्य माणसांची लूट होऊन आर्थिक गुन्हेगारी वाढत असल्याने ती कमी करावी लागणार असल्याचे दिसत आहे.पोलिस अधिकारी गुन्हेगारांना अभय देत असून फिर्यादीला बसवून आरोपींना फोन करत असल्याचा आरोप करून मला नागरिकांनी फोन करावा.आपण गुन्हेगारांची माहिती गुप्त ठेवा.ती माहिती फुटू देऊ नका.तहसीलदाराचा चालक खबरी असल्याच्या बातम्या आहे हे धक्कादायक आहे. ग्रामपंचायत भांडणे का वाढली असा सवाल केला.त्यांना राजकीय नेतेच आश्रय देत असल्याचे सांगून मोठा विनोद केला आहे.सामाजिक व्यवस्थेतील चुका दुरुस्त करायला हव्या आहे.मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे पोलिसांना घरे आणि कार्यालय इमारती उभ्या राहिल्याचे सांगून पुन्हा पुन्हा त्यांचे कौतुक केले आहे.(बहुधा येथील बितंबातमी फडणवीस यांचेकडे गृहीत धरून ते बोलत होते.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याची इमारत उद्घाटननिमित्त तिरंगी रंगात न्हाऊन निघाली असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान यावेळी उपस्थितांचे स्वागत नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले तर आभार कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी मानले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close