गुन्हे विषयक
अवैध व्यवसायाविरुध्द पोलिस कारवाई,कोपरगावात गुन्हा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात विविध अवैध व्यवसायांना ऊत आलेला असताना व त्यावर माध्यमांत मोठे मंथन झाले असताना शहर पोलिसांनी आता आपले कारवाईचे हत्यार उपसले असून नुकत्याच केलेल्या अवैध मटक्याच्या कारवाईत खडकी येथील आरोपी सतीश उत्तमराव खरात (वय -४३) व राहाता येथील आरोपी मोहसीन शेख (पूर्ण नाव माहिती नाही ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहरातील शांतता भंग होण्याच्या घटना वाढल्या असताना आता कोपरगाव शहर पोलिस सतर्क मोडवर असल्याचे दिसत असून त्यांनी काल दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास कोकमठाण शिवारात पुणतांबा रोडवर वैजापूर जाणारे रस्त्याच्या कडेला एका घराचे भिंतीचे आडोशाला आरोपी सतीश खरात व मोहसीन शेख हे मटका खेळताना आढळून आले आहे.त्यातील खरात यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात विविध गुन्हे वाढत असल्याचे वारंवार उघड होत आहे.घरातील लूट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी काकडीतील आई,बाप,आणि अविवाहित मुलाचा असे एकूण तीन बळी घेतले असताना शहरातील मध्यवस्तीत असलेल्या सचिन वॉच या कंपनीतील घड्याळाची भल्या पहाटे ३० लाख रुपयांची लूट केली होती.त्यातील काही आरोपी पकडले आहे तर अद्याप काही आरोपी नेपाळमध्ये फरार झाले आहेत.शहरात आकडे,मटका आदी अवैध व्यवसायाचा महापूर,अवैध वाळूचोरी,गावठी कट्टे,बंद पडलेले रेशन किंवा बंद करण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या नावावर मोठा रेशन घोटाळा,लाच लुचपत विभागाच्या दर दोन महिन्याला पडणाऱ्या धाडी त्यात अडकवणारे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.अशातच समोरासमोर गोळीबाराच्या घटना घडून शहरातील शांतता भंग होण्याच्या घटना वाढल्या असताना आता कोपरगाव शहर पोलिस सतर्क मोडवर असल्याचे दिसत असून त्यांनी काल दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास कोकमठाण शिवारात पुणतांबा रोडवर वैजापूर जाणारे रस्त्याच्या कडेला एका घराचे भिंतीचे आडोशाला वरील आरोपी सतीश खरात व मोहसीन शेख (मो.७५० ७३१ ३६१३) लोकांना चिठ्ठ्या देताना व हार जितीचा खेळ खेळताना व खेळविताना हे मटका खेळताना आढळून आले होते.त्यांना १०,२०,५०,१०० ५०० दराच्या रोख रकमेसह एक कार्बन एक बॉल पेन आदी साहित्यासह आढळून आले होते.यातील सतीश खरात नामक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-२६७/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(ए)सह भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३,५ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पो.हे.कॉ.बी.एस.कोरेकर आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.जालिंदर तमनर हे करीत आहेत.