जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव येथील स्थानिक के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.प्राप्ती दीपक बुधवंत हिने सुशिलाबाई शंकरराव काळे स्मृति-प्रित्यर्थ एस.एस.जी.एम. महाविद्यालय कोपरगाव येथे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

कु.प्राप्ती बुधवंत ही अकरावी विज्ञान वर्गाची विद्यार्थिनी असून तिने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके पटकावून संस्था व महाविद्यालयाचे नाव मोठे केले आहे.

   तिला या स्पर्धेतून रुपये ७००० रोख,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळणार आहे.कु.प्राप्ती बुधवंत ही अकरावी विज्ञान वर्गाची विद्यार्थिनी असून तिने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके पटकावून संस्था व महाविद्यालयाचे नाव मोठे केले असल्याचेही डॉ. ठाणगे म्हणाले. प्राप्ती बुधवंतला वादविवाद व वांग्मय मंडळाचे प्रमुख  डॉ.जिभाऊ मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

  दरम्यान प्राप्ती बुधवंत हिच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्र.प्राचार्य डॉ.विजय ठाणगे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर.सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close