शैक्षणिक
…या विद्यालयात चित्रकला परीक्षा संपन्न!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सर्वात जुन्या परीक्षा केंद्रांपैकी एक असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे शासकीय ग्रेड चित्रकला परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.कोपरगाव शहर व तालुक्यातील तब्बल १८ शाळांमधील १ हजार ०४५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) दरवर्षी घेतली जाते.२०२६ ची परीक्षा नुकतीच २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कोपरगावसह राज्यात मोठ्या उत्साहात पार पडली आहे.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा) दरवर्षी घेतली जाते.२०२६ ची परीक्षा नुकतीच २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडली आहे.विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षमतेला चालना देणारी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही परीक्षा कोपरगाव येथील एस.जी.विद्यालयाच्या केंद्रावर उत्साहात घेण्यात आली आहे.विविध शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग घेतला आहे.
या परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र शिरसाळे यांनी जबाबदारी सांभाळली तर उपकेंद्र संचालक म्हणून विद्यालयाचे कलाशिक्षक अतुल कोताडे व कलाशिक्षिका शितल अजमेरे यांनी काम पाहिले आहे.



