गुन्हे विषयक
महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या,पोलिसांत नोंद

न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव नजिक असलेल्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेजवळ उच्च शिक्षणासाठी रहिवासी असलेला विद्यार्थी वेदांत विकास बंगाळ (वय -१८) रा.मेहंदुरी ता.अकोले या विद्यार्थ्याने शशिकांत ज्ञानदेव संवत्सरकर यांचे खोलीत असताना अज्ञात कारणाने नुकतीच दुपारी ०२ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कोपरगाव शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चिंता,नैराश्य,क्रोध आणि निराशा या मनोवैज्ञानिक कारणांमुळे झालेल्या आत्महत्या,किशोरवयीन मुलांमध्ये तुलनेने जास्त आहेत आणि या गटातील मृत्यूचा दुसरा प्रमुख घटक बनला आहे.कोपरगाव तालुक्यात अशा आत्महत्या वारंवार होत असल्याचे उघड होत आहे.मात्र त्या झाकण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होताना दिसतो त्यामुळे वास्तव समोर येत नाही.
आत्महत्या ही जगभरातील सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.मागील अभ्यासातील पुराव्यांवरून चिंता,नैराश्य आणि आत्महत्येची विचारसरणी यांच्यातील संबंधांची पुष्टी झाली आहे.आत्महत्या ही सामाजिक विकासावर परिणाम करणारी जागतिक मानसिक आणि सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार,दरवर्षी ८,००,००० हून अधिक लोक यशस्वीरित्या आत्महत्या करतात,जे जागतिक मृत्यूच्या संख्येच्या १.४% आहेत.आत्महत्येचा विचार म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपले जीवन संपवायचे आहे या कल्पनेचा संदर्भ आहे.संशोधनातून असे दिसून आले आहे की,आत्महत्येच्या विचारांची निर्मिती आणि मजबुतीकरण मानसिक,सामाजिक आणि जैविक घटकांनी प्रभावित आहे.त्यापैकी,चिंता,नैराश्य,क्रोध आणि निराशा या मनोवैज्ञानिक कारणांमुळे झालेल्या आत्महत्या,किशोरवयीन मुलांमध्ये तुलनेने जास्त आहेत आणि या गटातील मृत्यूचा दुसरा प्रमुख घटक बनला आहे.कोपरगाव तालुक्यात अशा आत्महत्या वारंवार होत असल्याचे उघड होत आहे.मात्र त्या झाकण्याचा प्रयत्न होताना दिसतो त्यामुळे वास्तव समोर येत नाही.अशीच घटना नुकतीच कोपरगाव नजिक असलेल्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याची उघड झाली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेतील विद्यार्थी हा अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील रहिवासी असून तो कोपरगाव येथील संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकीत शिकण्यासाठी आलेला होता अशी माहिती आहे.तो या महाविद्यालय जवळ असलेल्या शशिकांत संवत्सरकर यांचे खोलीत राहत असताना त्याने दि.०२ जानेवारी रोजी दुपारी ०२ वाजता गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.या प्रकरणी त्याचे वडील विकास आत्माराम बंगाळ (वय-४५) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे,पोलिस हे.कॉ.तमनर आदींनी भेट दिली आहे.दरम्यान या घटनेबाबत विविध तर्कवितर्क करण्यात येत आहेत.त्यांचेवर मेहंदुरी या गावात शनिवार दिनाक ०४ जानेवारी रोजी सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.जालिंदर तमनर हे करीत आहेत.