जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

राज्यात हॉकी वाढविण्यात गौतम स्कूलचा मोठा वाटा – दावा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव – (प्रतिनिधी)


   महाराष्ट्रात हॉकी वृद्धिंगत करण्यामध्ये गौतम पब्लिक स्कूलचा वाटा सर्वात मोठा असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त चैताली काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“जिल्हा व राज्य,देश पातळीवर होणाऱ्या आवश्यक ते प्रशिक्षण,मार्गदर्शन व सोयी सुविधा गौतम पब्लिक स्कूल मध्ये उपलब्ध असून लवकरच हॉकीसाठी सँड टर्फ मैदान देखील तयार करू”- चैताली काळे.विश्वस्त,कर्मवीर काळे संस्था.



   कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतम पब्लिक स्कूलमध्ये दि.३ व दि.४  ऑगस्ट या दोन दिवसीय  राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण नुकतेच संस्थेच्या सचिव चैताली काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी त्यांनी विजयी संघाच्या सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक संघ व्यवस्थापक यांचे अभिनंदन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

   सदर प्रसंगी संस्था विश्वस्त सिकंदर पटेल,विश्वस्त बाबासाहेब कोते,शाळेचे प्राचार्य नूर शेख,रईसा शेख,गौतमचे विजयी संघ,शाळेचा क्रीडा विभाग व हाऊस मास्टर्स उपस्थित होते.

   यावेळी चैताली काळे म्हणाल्या की,”क्रीडा क्षेत्रात गौतम पब्लिक स्कूलचा नावलौकिक खूप मोठा आहे.जिल्हा,राज्य व देशपातळीवर होणाऱ्या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूंना आवश्यक ते प्रशिक्षण,मार्गदर्शन व सोयी सुविधा गौतम पब्लिक स्कूल मध्ये उपलब्ध असून लवकरच हॉकीसाठी सँड टर्फ मैदान देखील तयार करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.महाराष्ट्रात हॉकी वृद्धिंगत करण्यामध्ये गौतम पब्लिक स्कूलचा वाटा सर्वात मोठा असल्याची कबुली याप्रसंगी खास करून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर तसेच जॉईंट सेक्रेटरी हॉकी अजीज सय्यद यांनी दिली आहे.

    दरम्यान या क्रीडा महोत्सवात राज्यातील पुणे,नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित फुटबॉल,हॉकी व व्हॉलीबॉल मुली असे एकूण ३० संघ सहभागी झाले होते.संस्थेचे विश्वस्त आ.काळे यांचा वाढदिवस राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्याची परंपरा शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी मागील वर्षा पासून सुरू केली आहे.दोन दिवस पार पडलेल्या व अतिशय रोमांचक ठरलेल्या या स्पर्धेत गौतम पब्लिकच्या हॉकी व फुटबॉल संघाने सर्वच संघाना पराभवाची धूळ चारून विजेतेपदाचा चषक पटकाविला आहे.याप्रसंगी शाळेचे प्राचार्य नूर शेख  यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close